Shivrayancha Chhava : "रक्तात उकळतो भगवा हा"; 'शिवरायांचा छावा'चं चित्तथरारक पोस्टर आऊट!
Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं चित्तथरारक पोस्टर आऊट झालं आहे.
Shivrayancha Chhava : मराठी मनोरंजनसृष्टीत रहस्य, नाट्य, रोमँटिक जॉनरसह ऐतिहासिक सिनेमेदेखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं चित्तथरारक पोस्टर आऊट झालं आहे.
'शिवरायांचा छावा' या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) सांभाळली आहे. या सिनेमाचं चित्तथरारक पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"रक्तात उकळतो भगवा हा लाव्हा रुद्ररुप गर्जतो शिवरायांचा छावा. 'शिवरायांचा छावा' 16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात".
'शिवरायांचा छावा'चे चित्तथरारक पोस्टर भेटीला (Shivrayancha Chhava New Poster Out)
आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा' 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित या सिनेमाचे चित्तथरारक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
View this post on Instagram
भूषण पाटील झळकणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
बलदंड शरीरयष्टी, करडी नजर आणि जबरदस्त आत्मविश्वासासह छत्रपती संभाजी महाराज एका शक्तिशाली वाघासोबत झुंज देताना या पोस्टरमध्ये दिसताहेत. पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य मराठमोळा अभिनेता भूषण पाटील (Bhushan Patil) यांनी उचललं आहे.
महान पराक्रमी राजाची भूमिका साकारायला मिळणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट : भूषण पाटील
‘स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजांनी स्वतः मरणांतिक यातना सहन करून, स्वराज्याला जीवनदान देणाऱ्या अशा या महान पराक्रमी राजाची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे भूषण सांगतो.
संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
संबंधित बातम्या