शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट बास्टियनमधून चोरी, 80 लाखांची कार पार्क करताच गायब
Shilpa Shetty Restaurant : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून लाखो रुपयांची BMW कार चोरीला गेली आहे. दादरमधील रेस्टॉरंटमधील घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Shilpa Shetty Restaurant Faces Security-Concerns : बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी अभिनेत्री असण्यासोबत व्यावसायिकही आहे. मुंबईमध्ये शिल्पा शेट्टीचं आलिशान रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमधून चोरी झाल्याची मोठी घटना घडली आहे. शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून लाखो रुपयांची BMW कार चोरीला गेली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. बास्टियन रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून BMW Z4 कार चोरी झाल्याने एकच खळबळ माजली आहे. दादरमधील रेस्टॉरंटमधील घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट बास्टियनमधून कार चोरी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं दादर पश्चिमेकडील कोहिनूर स्क्वायरमध्ये 48 व्या मजल्यावर बास्टियन - एट द टॉप रेस्टॉरंट आहे. येथे रविवारी एक धक्कादायक घटना घडली. या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती बीएमडब्ल्यू कारने मित्रांसोबत आला होता. या व्यक्तीने त्याची 80 लाख रुपये किमतीची टू-सीटर कन्वर्टिबल BMW Z4 कार बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ठेवली होती. मात्र, बिल्डींगच्या पार्किंगमधील कार चोरीला गेल्याने खळबळ माजली आहे. कार मालकाने कार चोरीला गेल्याची तक्रार शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
80 लाखांची कार पार्क करताच गायब
बास्टियन रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून कार चोरील गेल्याने आता तिचं रेस्टारंट चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. चोरीला गेलेल्या कारचे मालक वांद्रे येथील 34 वर्षीय व्यापारी रुहान फिरोज खान आहेत. फिरोज खान आपल्या दोन मित्रांसह मध्यरात्री 1 च्या सुमारास बस्तियानमध्ये पोहोचले आणि त्यांनी आपल्या कारच्या चाव्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वॉलेट पार्किंगला दिल्या.
अज्ञात व्यक्तींनी पार्किंगमधून चोरली बीएमडब्ल्यू कार
रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर रुहानने पार्किंग कर्मचाऱ्यांकडून त्याची कार परत मागितली, पण कार गायब असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. सीसीटीव्ही फुटेजने तपासलं असता, अज्ञात व्यक्तींनी पहाटे 2 च्या सुमारास बीएमडब्ल्यू कार चोरली होती, त्यानंतर कारमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि या प्रकरणात तातडीने तपास सुरू करण्यात आला.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :