एक्स्प्लोर

Shilpa Shetty : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत झळकण्यासाठी शिल्पा शेट्टी सज्ज! KD The Devil लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचा 'केडी द डेविल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या शिल्पाने एकापेक्षा एक सिनेमांत काम करत प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यास शिल्पा सज्ज आहे. 

'केडी द डेविल' सिनेमात झळकणार शिल्पा शेट्टी!

शिल्पा शेटीचा 'केडी द डेविल' (KD The Devil) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टीसह कन्नड सुपरस्टार ध्रुव सरजादेखील (Dhruva Sarja) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त निर्मात्यांनी या सिनेमातील शिल्पा शेट्टीचा लुकदेखील शेअर केला आहे. साडी, वेणी, काळा चश्मा आणि हातात बांगड्या असा काहीसा शिल्पाचा लुक आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

'केडी द डेविल' हा सिनेमा गॅंगस्टरवर आधारित आहे. या नाट्यमय सिनेमात शिल्पा सत्यवतीच्या भूमिकेत झळकणार आहे. शिल्पा शेट्टीचा 'केडी द डेविल' या सिनेमातील लुक 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमातील आलिया भट्टसारखा आहे. हा सिनेमा 1970 च्या दशकावर भाष्य करणारा आहे. या सिनेमाची निर्मिती केवीएन या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत करण्यात येत आहे. हा सिनेमा कन्नडसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

संजय दत्त झळकणार नकारात्मक भूमिकेत 

'केडी द डेविल' या सिनेमात संजय दत्त नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तसह या सिनेमात वी. रवीचंद्रनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिल्पा शेट्टीने याआधीदेखील दाक्षिणात्य सिनेमांत काम केलं आहे. आता 'केडी द डेविल' या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्यासाठी शिल्पा शेट्टी सज्ज आहे. 

शिल्पा शेट्टीने शेअर केलं 'केडी द डेविल' सिनेमाचं पोस्टर (Shilpa Shetty Shared (KD The Devil Poster)

शिल्पा शेट्टीने आपल्या आगामी 'केडी द डेविल' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पा शेट्टीने लिहिलं आहे,"गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज या खास दिवसानिमित्त मी माझ्या नव्या सिनेमाचं पोस्टर तुमच्यासोबत शेअर करत आहे". शिल्पाच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

संबंधित बातम्या

Nikamma Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शिल्पा शेट्टीचा 'निकम्मा' जोरदार आपटला, शो झाले रद्द

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget