एक्स्प्लोर

तारीख पे तारीख! शिजान खानच्या जामिनावर 2 मार्चला होणार सुनावणी

Sheezan Khan : आज (27 फेब्रुवारी) शिजानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी न्यायालयात युक्तिवादाच्या वेळी आपला अशिल मुस्लिम असल्यामुळे त्याला जामीन मिळत नसल्याचा युक्तिवाद केला.

Sheezan Khan: अभिनेत्री  तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) आजही जामीन मिळाला नाही. वसई सत्र न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख 2 मार्च ही दिली आहे. शिजानच्या वकिलांनी दिनांक 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आज (27 फेब्रुवारी) शिजानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी न्यायालयात युक्तिवादाच्या वेळी आपला अशिल मुस्लिम असल्यामुळे त्याला जामीन मिळत नसल्याचा युक्तिवाद केला. याला सरकारी वकिल संजय मोरे आणि तुनिषाचे वकिल तरुण शर्मा प्रत्युत्तर दिलं. 

दोन तास झाला युक्तिवाद

शिजान खानच्या जामीन अर्जावर आज जवळपास दोन तास युक्तिवाद झाला. अर्धा तास बंद रुममध्ये हा युक्तिवाद झाला. आतापुढी युक्तिवाद 2 मार्चला पुन्हा होईल. शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे 24 डिसेंबरला तुनिषाने वसईच्या कामण येथील सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषाला अत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजान खानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शिजान न्यायलयीन कोठडीत आहे. 

शिजानच्या वकिलांच्या वतीने त्याला जामीन मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ही प्रयत्न सुरु होते. मात्र, वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानं  शिजानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायलयात जामीन अर्ज मागे घेतला. वसई सत्र न्यायालयात जामिनसाठी अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून शिजानला पुन्हा तारीख पे तारीख मिळत आहे.

कोण आहे शिझान खान? 

शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानं 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' (Ali Baba : Dastaan - E - Kabul) या मालिकेमध्ये देखील काम केलं होतं. या मालिकेत तुनिषानं देखील प्रमुख भूमिका साकारली.

तुनिषानं या मालिकांमध्ये केलं काम

तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), 'इंटरनेट वाला लव' (Internet Wala Love), 'इश्क सुभान अल्लाह' (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. तुनिषाच्यानं आत्महत्या केल्यानं अनेकांना धक्का बसला होता. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sheezan Khan Mother Post: शिझान खानची बहिण रुग्णालयात दाखल; आई भावूक, म्हणाली, "आम्ही मुस्लिम आहोत म्हणून..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget