Shark Tank India : जाणून घ्या 'शार्क टँक इंडिया' या रिअॅलिटी शोची संकल्पना
Shark Tank India : 'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाने भारतीय टेलिव्हिजन विश्वामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे.
Shark Tank India : 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाने भारतीय टेलिव्हिजन विश्वामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन रिअॅलिटी कार्यक्रमावर आधारीत असलेला हा कार्यक्रम भारतात 'शार्क टँक इंडिया' या नावाने प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात देशातील मोठे सात उद्योगपती परीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत.
काय आहे 'शार्क टँक इंडिया' कार्यक्रमाचे उद्दिष्ट?
जगभर प्रसिद्ध असलेला हा रिॲलिटी शो भारतात देखील यशस्वी ठरला आहे. तरुण आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे या रिॲलिटी शोचे खरे उद्दिष्ट आहे. या शो मध्ये देशातील सात यशस्वी उद्योजक गुंतवणूकदार आहेत ज्यांना शार्क म्हणून संबोधले जाते. अनेक उद्योजक आपल्या भन्नाट व्यवसायिक कल्पना घेऊन येतात व एक चांगली डील घेऊन जातात. ज्या उद्योजकांच्या व्यवसायिक संकल्पना शार्कला आवडतात ते शार्क त्या उद्योजकांच्या व्यवसायात गुंतवणूक करतात.
कोण आहेत 'शार्क टँक इंडिया'शो चे परिक्षक?
अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover), पियुष बन्सल (Peyush Bansal), नमिता थापर (Namita Thapar), विनिता सिंग (Vineeta Singh), अनुपम मित्तल (Anupam Mittal).
शार्क टॅंकने जगभरातील लक्षावधी लोकांना उद्योजकतेविषयी सुशिक्षित केले आहे आणि आता भारतीय प्रेक्षकांना देखील उद्योजकतेबाबत अधिक सुजाण करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. जे लोक उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहतात, त्यांना 'बदलत्या भारताच्या नव्या चित्रा'वर फोकस ठेवून हा शो आशा देतो. शार्क टॅंक इंडियामध्ये आपला व्यवसाय खूप वाढवण्याची स्वप्नं पाहणार्या होतकरू व्यावसायिकांकडून नावीन्यपूर्ण आणि भविष्यवेधी व्यवसाय कल्पना सादर करण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या
Shark Tank Judges Profile : एका अनोख्या कल्पनेसाठी देतायत कोटींची मदत, कोण आहेत ‘हे’ भारतीय ‘शार्क’?
Shark tank india : भारतातील पहिला बिझनेस रिअॅलिटी शो ठरतोय 'शार्क टँक इंडिया' जाणून घ्या या शो विषयी बरंच काही...
RRR Release Date : बहुप्रतिक्षित RRR चित्रपटाची अंतिम रिलीज डेट आली समोर, 'या' तारखेला होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha