Shamshera New poster : 'शमशेरा'चे नवे पोस्टर आऊट; हाहात कुऱ्हाड, विखुरलेले लांबलचक केस...रणबीरचा दमदार लूक
Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या आगामी 'शमशेरा' सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Shamshera New poster : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'शमशेरा' (Shamshera) सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच निर्मात्यांनी 'शमशेरा'चे नवे पोस्टरदेखील रिलीज केले आहे.
हाहात कुऱ्हाड, विखुरलेले लांबलचक केस असा नव्या पोस्टरमधील रणबीरचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'शमशेरा' सिनेमात संजय दत्त एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणबीर कपूर एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, 'शमशेरा' सिनेमा स्वातंत्र्यपूर्व काळावर भाष्य करणारा आहे.
22 जुलैला सिनेमा होणार रिलीज
'शमशेरा' हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलगू भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. 'शमशेरा' सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली आहे. 22 जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रोनित रॉय देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
View this post on Instagram
ट्रेलर रिलीज
'शमशेरा' सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. पण आता ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला 1871 असं लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर 'आझादी तुम्हे कोई देता नही', 'ये कहानी है शमशेरा की' हे डायलॉग्स ऐकू येतात. ट्रेलरमध्ये रणबीरची एन्ट्री होते. त्यानंतर वाणी कपूर ही एका डान्सरच्या भूमिकेत दिसते. वाणी आणि रणबीरच्या भूमिकेनंतर संजय दत्तच्या शुद्ध सिंह या भूमिका दिसते. ट्रेलरमधील रणबीर, वाणी आणि संजयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
संबंधित बातम्या