Shaitaan Teaser Out : "जहर भी मैं, दवा भी मैं"; अजय देवगन आणि आर. माधवनच्या 'शैतान'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Shaitaan Teaser Out : अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) आणि आर. माधवन (R. Madhavan) अभिनीत 'शैतान' (Shaitaan) या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे.

Shaitaan Teaser Out : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) 2024 हे वर्ष गाजवण्यासाठी सज्ज आहे. अजयचा आगामी 'शैतान' (Shaitaan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे.
'शैतान' या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. एक मिनिट 29 सेकंदाचा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. पण हा सिनेमा पाहताना नक्कीच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'शैतान'च्या टीझरमध्ये काय आहे?
'शैतान'च्या टीझरची सुरुवातच आर.माधवनच्या आवाजाने होते. यात राक्षस म्हणतो,"कहते है ये पुरी दुनिया बहरी है, लेकिन सुनती सिर्फ मेरी है, काले से भी काला मैं, बहकाने का प्याला मै, तंत्रसे लेकर श्लोक का मालिक हूँ मैं नौ लोक का". टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून प्रेक्षकांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियावर हा टीझर धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram
अजय देवगनने शेअर केला 'शैतान'चा टीझर
अभिनेता अजय देवगनने 'शैतान' सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"वो पूछेगा तुमसे.. एक खेल खेलोगे? पर उसके बहकावे में मत आना". अजयच्या या टीझरवर कमेंट्स करत नेटकरी सिनेमासाठी उत्सुक असल्याचं सांगत आहेत. टीझर कमाल आहे, ही तर फक्त झलक आहे, अंगावर शहारे आणणारे डायलॉग, 8 मार्च 2024 पर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही, भीतीदायक टीझर, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'शैतान' या सिनेमात अजय देवगन (Ajay Devgn), आर. माधवन (R. Madhavan) आणि ज्योतिका (Jyotika) मुख्य भूमिकेत आहेत. तसेच ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सस्पेन्स, थ्रिलर आणि नाट्य या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजय देवगन 2024 गाजवणार आहे. शैतान'सह अजयचे 'औरों में कहां दम था','मैदान','सिंघम अगेन','रेड 2' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
संबंधित बातम्या























