Ajay Devgn : अजय देवगनचा 'शैतान' सिनेमातील फर्स्ट लूक आऊट! सस्पेन्स, थ्रिलर अन् बरंच काही
Ajay Devgn Shaitaan First Look Out : अजय देवगनचा 'शैतान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.
Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) सध्या 'मैदान' (Maidaan) आणि 'शैतान' (Shaitaan) या सिनेमांमुळे चर्चेत आहे. 2024 मध्ये अजयचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता 'शैतान' या आगामी सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
अजय देवगन सध्या 'शैतान' या थ्रिलर सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. आता अभिनेत्याने या सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये आर माधवन (R. Madhavan) आणि ज्योतिकादेखील (Jyotika) दिसून येत आहे. पोस्टर शेअर करत टीझरची रिलीज डेट शेअर करण्यात आली आहे. अजय देवगन, आर माधवन आणि ज्योतिकाचा 'शैतान' हा सिनेमा 8 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजय देवगनने शेअर केलं पोस्टर (Ajay Devgn Shared Poster)
अजय देवगनने सोशल मीडियावर 'शैतान'चं नवं पोस्टर शेअर केला आहे. अजयसह आर माधवन आणि ज्योतिकाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विकास बहलने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अजय देवगन, आर माधवन आणि ज्योतिका या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अजय देवगन, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram
सस्पेन्स, थ्रिलर आणि नाट्य अशा बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना 'शैतान' या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. हा हॉरर सिनेमा आहे. भारतात काळी जादू कशी होता? त्याचा परिणाम काय होतो? हे या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. अजयचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अजय गाजवणार 2024 वर्ष
अजय देवगनचे 2024 मध्ये पाच सिनेमे रिलीज होणार आहेत. 'शैतान'सह अजयचे 'औरों में कहां दम था','मैदान','सिंघम अगेन','रेड 2' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 2024 मध्ये अजयचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळणार आहे. अजयच्या या सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. अजयचा 'भोला' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला.
संबंधित बातम्या