एक्स्प्लोर

Shah Rukh Khan At Airport:  सेल्फी काढण्यासाठी आलेल्या फॅनसोबत शाहरुखनं केलं असं काही; एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

मुंबई एअरपोर्टवरील शाहरुखचे (Shah Rukh Khan) फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

Shah Rukh Khan At Airport:  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या राजकुमार हिरानीच्या डंकीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. शाहरुख, तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि  या चित्रपटातील इतर कलाकार हे डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेले होते. चित्रपटाच्या शूटिंगचा काही भाग पूर्ण करुन  आता डंकी चित्रपटाची टीम  मुंबईत आली आहे. शाहरुख हा नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी शाहरुखसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. मुंबई एअरपोर्टवरील शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल 

मुंबई एअरपोर्टवर शाहरुख ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. मुंबई एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखसोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  सेल्फी काढायला आलेल्या एका व्यक्तीच्या हाताला शाहरुख हा धक्का देतो. त्या व्यक्तीला नंतर बॉडीगार्ड्स ढकलतात. व्हायरल व्हिडीओमधील शाहरुखचं हे वर्तन पाहून नेटकरी भडकले आहेत. 

नेटकरी शाहरुखवर भडकले

एअरपोर्टवरील शाहरुखच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'उगाच अॅटिट्युड दाखवत आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, अजून यांचे चित्रपट हिट करा, 'अजून यांना भाव द्या'

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरुखचे आगामी चित्रपट

शाहरुख लवकरच जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात शाहरुखसोबतच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. आता डंकी या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. डंकी चित्रपटात शाहरुख आणि तापसी यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shah Rukh Khan: शाहरुखनं 'या' मॉडेलला जेवणासाठी 'मन्नत' मध्ये केलं आमंत्रित; किंग खाननं असा केला पाहुणचार, स्वत: बनवली 'ही' डिश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 12 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 12 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Share Market : 1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
Sudarshan Ghule Beed: सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
Embed widget