Pathaan Tickets Price : किंग खानची चाहत्यांना खास भेट; आता 'पठाण' फक्त 110 रुपयांत पाहता येणार
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाच्या तिकीटाची किंमत 110 रुपये करण्यात आली आहे.
Shah Rukh Khan Pathaan Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाचा आजही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा देशासह परदेशातदेखील रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाचे तिकीट दर इतर सिनेमांच्या तुलनेत जास्त असले तरी हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहत आहे. दरम्यान, निर्मात्यांनी या सिनेमाचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहरुखचा 'पठाण' पाहा फक्त 110 रुपयांत!
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे. आता यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर एक खास पोस्टर शेअर करत 'पठाण'च्या तिकीट दराबद्दल माहिती दिली आहे. यशराजने 'पठाण' सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे, "सोमवार ते गुरुवार 'पठाण' सिनेमाच्या तिकीटाची किंमत 110 असेल. तसेच, 110 रुपयांत हा सिनेमा प्रेक्षकांना आयनॉक्स, पीव्हीआर आणि सिनेपॉलिसमध्ये पाहता येणार आहे".
View this post on Instagram
'पठाण' 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील
बादशाहच्या 'पठाण'ने सिनेमागृहात 25 दिवस पूर्ण केले आहेत. भारतात हा सिनेमा तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 511.42 कोटींची कमाई केली आहे. जगभरातदेखील 'पठाण'ची चांगलीच क्रेझ आहे. लवकरच हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची करेल. 'पठाण' या सिनेमात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
'टायगर'-'पठाण' पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार?
'पठाण' या सिनेमात शाहरुख खानसह टायगर अर्थात सलमान खानदेखील (Salman Khan) भाव खाऊन गेला आहे. या सिनेमात भाईजान पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. आता सलमानच्या 'टायगर' (Tiger) सिनेमात 'पठाण' म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) पाहुणा कलाकार म्हणून झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन सुपरस्टारला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. एप्रिल महिन्यात शाहरुख या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :