Shahrukh Khan : आर्यन-सुहानाचा प्रश्न, आपला धर्म कोणता, हिंदू की मुस्लिम? शाहरूखचं उत्तर...
एका मुलाखतीमध्ये मुलांच्या धर्माबाबत शाहरूखने सांगितले होते.
![Shahrukh Khan : आर्यन-सुहानाचा प्रश्न, आपला धर्म कोणता, हिंदू की मुस्लिम? शाहरूखचं उत्तर... shah rukh khan opened up about kids aryan khan and suhana khan religion Shahrukh Khan : आर्यन-सुहानाचा प्रश्न, आपला धर्म कोणता, हिंदू की मुस्लिम? शाहरूखचं उत्तर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/09/157ad68157aa49066ec64b885d7c6c49_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shahrukh Khan : बॉलिवूडचा बादशाहा अशी ओळख असणारा अभिनेता शाहरूख खान नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शाहरूखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत होता. त्यानंतर आर्यनची जामीनावर सुटका झाली. आर्यन, सुहाना (Suhana) आणि अबरामचे (Abram Khan) फोटो शाहरूख नेहमी शेअर करत असतो. त्याच्या तिनही मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका मुलाखतीमध्ये मुलांच्या धर्माबाबत शाहरूखने सांगितले होते.
शाहरूखने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, 'आमचा धर्म कोणता आहे? असा प्रश्न माझ्या मुलांनी मला विचारला होता. तेव्हा मी त्यांना उत्तर दिले होतो की, तुम्ही सर्वप्रथम भारतीय आहात आणि तुमचा धर्म माणुसकी आहे. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा... हे गाणे मी त्यांना गाऊन दाखवतो.'
Shah Rukh Khan: बॉलिवूडच्या किंग खान आहे एवढ्या संपत्तीचा मालक; किती घेतो मानधन?
असाच काहीसा प्रश्न गौरीला देखील विचारण्यात आला होता. 'कॉफी विथ करण' शोमध्ये गौरीला तिच्या धर्माबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले, 'आमच्या मुलांमध्ये हिंदू धर्माचा इन्फ्लुयन्स जास्त आहे.' पुढे गौरीला मुस्लिम मुलाशी केलेल्या लग्नाबद्दल विचारल्यावर तिने सांगितले, 'आम्ही संतुलन ठेवतो. मी शाहरूखच्या धर्माचा आदर करते. याच प्रमाणे शाहरूखला देखील माझ्या धर्माचा आदर आहे. आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करातो.'
View this post on Instagram
लवकरच शाहरूखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटात शाहरूखसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार देखील दिसणार आहेत. कभी खुशी कभी गम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, ओम शांती ओम, माय नेम इज खान आणि दिलवाले या शाहरूखच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
Shahrukh Khan सोबत लग्नानंतरही गौरीनं बदलला नाही धर्म; सांगितलं हे कारण
Bigg boss 15 : कँडल लाइट डिनर आणि रोमँटिक डान्स; बिग बॉसच्या घरात शमिता-राकेशची परफेक्ट डेट नाइट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)