Bigg boss 15 : कँडल लाइट डिनर आणि रोमँटिक डान्स; बिग बॉसच्या घरात शमिता-राकेशची परफेक्ट डेट नाइट
छोट्या पडद्यावरील नेहमी चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉसचा 15 वा सिझन सुरू आहे.

Bigg boss 15 : छोट्या पडद्यावरील नेहमी चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉसचा 15 वा सिझन सुरू आहे. गेली अनेक वर्ष या शोचं सुत्रसंचालन अभिनेता सलमान खान (Salman Khan) करत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना वेगवेगळे टास्क दिले जातात. सध्या सुरू असलेल्या 15 व्या सिझनमध्ये देखील स्पर्धक अतरंगी टास्क खेळताना दिसतात. या सिझनमधील अभिनेत्री शमिता शेट्टीने (Shamita Shetty) सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये शमिताची अभिनेता राकेश बापटसोबत (Raqesh Bapat) खास मैत्री झाली होती. त्यानंतर बिग बॉस 15 मध्ये शमिताने सहभाग घेतला. गेली काही दिवस शमिता राकेशला मिस करत होती. त्यानंतर राकेशने बिग बॉस-15 मध्ये एन्ट्री केली. तसेच शमिताची खास मैत्रीण नेहा भसीनने देखील बिग बॉस-15 मध्ये भाग घेतला. नुकतीच बिग बॉसने राकेश आणि शमितासाठी रोमॅंटिक डेट नाइट प्लान केली.
डिनर डेटसाठीचा रोमँटिक सेट-अप
बिग बॉसच्या घरातील स्टोर एरियामध्ये ही राकेश आणि शमिताची डेट नाइट झाली. या डेट नाइटसाठी डिनर टेबल,लाइट्स आणि म्यूझिक असा रोमँटिक सेट-अप करण्यात आला होता. राकेश आणि शमिता दोघेही मजा मस्ती करताना दिसत होते. सध्या त्यांच्या या डेट नाइटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शमिता आणि राकेशच्या चाहत्यांनी या डेटच्या फोटोंना पसंती दिली आहे.
बिग बॉस ओटीटीमध्ये असताना राकेश आणि शमिताची खास मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शमिता आणि राकेश यांची जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जेव्हा शमिताने बिग बॉस-15 मध्ये एन्ट्री केली होती. तेव्हा राकेश तिला सोशल मीडियावरून सपोर्ट करत होता. शमिता शेट्टी ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण. तिने मोहब्बते चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने झहर, फरेब, कॅश अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
Tiku Weds Sheru : Kangana Ranaut करणार सिने-निर्मिती व्यवसायात पदार्पण, सिनेमात Nawazuddin Siddiqui असणार मुख्य भूमिकेत
महत्त्वाच्या बातम्या





















