एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : पहाटे 5 वाजता झोपतो, 9 वाजता शुटिंग, रात्री 2 वाजता घरी, मध्यरात्री वर्कआउट; हेक्टिक रुटिनसह 'वन मिल डाएट' फॉलो करतो किंग खान

Shah Rukh Khan Diet and Workout Plan : अभिनेता शाहरुख खानने सांगितलं की, 2020 मध्ये कोविड -19 साथीच्या आजारादरम्यान त्याने कसे काम केलं आणि बॉडी कशी तयार केली याबद्दलही त्याने सांगितलं आहे.

मुंबई : बॉलिवूडचा किंग सुपरस्टार शाहरुख खान याचे जगभरात चाहते आहेत.  शाहरुख खान नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. त्याचा अभिनय, स्टाईल आणि फिटनेस यामुळे चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी खास आदर आणि प्रेम आहे. त्याचे चाहते त्याच्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. आता शाहरुख खानच्या लाईफस्टाईलबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

शाहरुख खानची लाईफस्टाईल कशी आहे?

अभिनेता शाहरुख खान त्याच्या लाईफस्टाईलबद्दल सांगितलं की, तो पहाटे पाच वाजता झोपतो आणि सकाळी 9 वाजता उठतो, तसेच तो दिवसातून फक्त एक वेळच जेवण करतो आणि त्यानंतर काम करतो. शाहरुख खानने त्याच्या जीवनशैलीबद्दल सांगितलं आहे, तो पहाटे 5 वाजता झोपतो, सकाळी 9 किंवा 10 वाजता उठतो. तो मध्यरात्री 2 वाजता कामावरून घरी पोहोचल्यानंतर झोपण्यापूर्वी व्यायाम करतो. द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

हेक्टिक रुटिनसह 'वन मिल डाएट' फॉलो करतो किंग खान

अभिनेता शाहरुख खान म्हणाला, "मी पहाटे 5 वाजता झोपतो. मार्क वाह्लबर्ग उठल्यावर मी झोपायला जातो आणि मग मी शूटिंग असल्यास मी सकाळी सुमारे 9 किंवा 10 वाजता उठतो. पण मग मी मध्यरात्री 2 वाजता शूटींगवरुन घरी येतो. त्यानंतर व्यायाम करतो, अंघोळ करुन झोपतो". मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान वन मिल डाएट करतो, म्हणजेच तो दिवसातून फक्त एक वेळ जेवण करतो. किंगखान दररोज फक्त अर्धा तास व्यायाम करतो.

चार वर्षांचा ब्रेकवर पहिल्यांदाचा प्रतिक्रिया

शाहरुख खाने मध्यंतरीच्या काळात अभिनयातून चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. याविषयी बोलताना शाहरुखने सांगितलं की, "वयाच्या 55 ​​व्या वर्षी मी एक प्रकारचा कामातून विश्रांती (Sabbatical Leave) घेतली होती. महामारीच्या काळात दुसरं काही करायचं नव्हतं आणि मी सर्वांना सांगत होतो की, इटालियन स्वयंपाक शिका आणि व्यायाम करा. या काळात मी बॉडी बनवली. चार वर्षांनी लोक मला मिस करू लागले, कारण त्याआधी मी एक नेहमी चर्चेत असणारा चेहरा होतो.

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा खास सन्मान

77 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल सोहळ्यात शाहरुख खानला नुकताच जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) पारडो अल्ला कॅरीरा, किंवा करिअर लेपर्ड (The Pardo alla Carriera or Career Leopard) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलचे कलात्मक दिग्दर्शक जिओना ए नाझारो यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि यशाबद्दल चर्चा केली. त्याने त्याच्या पुढच्या किंग या चित्रपटाच्या तयारीच्या कामाबद्दल आणि चित्रपट निर्माते सुजॉय घोष यांच्या सहकार्याबद्दल खुलासा केला.

किंग चित्रपटाबद्दल अपडेट

आगामी किंग चित्रपटाबद्दल शाहरुख खान म्हणाला होता, "मला काही प्रकारचे चित्रपट करायचे आहेत, कदाचित ते जास्त वयावर आधारित असतीलल आणि मला 6-7 वर्षांपासून काहीतरी करून बघायचं आहे. मी त्याबद्दल विचार करत होतो आणि मी सुजॉयकडे याचा उल्लेख केला होता. एक दिवशी आम्ही आमच्या ऑफिसमध्ये काम करत असताना, तो म्हणाला, 'सर, माझ्याकडे एक विषय आहे, मला त्यावर काम सुरू करायचं आहे. थोडे वजन कमी करावं लागेल, थोडे स्ट्रेचिंग करावं लागेल." आगामी किंग चित्रपटात शाहरुख खानची मुलगी आणि अभिनेत्री सुहाना खान देखील त्याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Plastic Surgery : श्रीदेवीच्या लेकीनं सुंदर दिसण्यासाठी केली प्लास्टिक सर्जरी, अभिनेत्रीच्या खुलाशानंतर चाहते चकित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
Bhoot Bangla: अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
आज्जी आशा भोसले यांच्या आठवणीनं नात व्याकूळ; इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत म्हणाली, 'रोज सूर्य उगवतो...'
आज्जी आशा भोसले यांच्या आठवणीनं नात व्याकूळ; इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत म्हणाली, 'रोज सूर्य उगवतो...'

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Gold Silver Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
Embed widget