Jawan Theme Song : शाहरुखच्या 'जवान'चं थीम साँग आऊट! व्हिडीओ शेअर करत किंग खान म्हणाला,"एक घट्ट मिठी..."
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या आगामी 'जवान' सिनेमातील थीम साँग आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Shah Rukh Khan Jawan Theme Song Out Now : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जवान' सिनेमासंबंधित प्रत्येक अपडेट ते जाणून घेत आहेत. आता या बहुचर्चित सिनेमातील थीम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. थीम साँगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'जवान' सिनेमाचा प्रीव्यू गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रीव्यूमध्ये शाहरुख वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून आला आहे. आता 'जवान'च्या प्रीव्यूवरुन रॅपर राजा कुमारीने सोशल मीडियावर थीम साँगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अनिरुद्ध रविचंदन यांनी हे गाणं गायलं आहे.
View this post on Instagram
शाहरुखने शेअर केला 'जवान'च्या थीम साँगचा व्हिडीओ
शाहरुख खानने 'जवान'च्या थीम साँगचा व्हिडीओ ट्वीट करत चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"खूपच कमाल.. एक घट्ट मिठी आणि खूप खूप प्रेम". किंग खानच्या या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच थीम साँगचा व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
I do too….my Thunder!! Big hug and love to you. https://t.co/okkGkfMSQS
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 14, 2023
शाहरुखचा 'जवान' कधी होणार रिलीज? (Shah Rukh Khan Jawan Released Date)
शाहरुख खानच्या 'जवान'ची चाहते प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि नयनतारासह विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर, रिद्धी डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोणची झलकही सिनेमात पाहायला मिळणार आहे.
'जवान' या बिग बजेट सिनेमात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत झळकणार असून या सिनेमासाठी त्याने 100 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. 220 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी 50 कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
संबंधित बातम्या