Shah Rukh Khan : शाहरुखने रचला इतिहास; 'Jawan' ठरला वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
Jawan : शाहरुख खानचा 'जवान' हा वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
Shah Rukh Khan Jawan Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सिनेमाने इतिहास रचला आहे. 'जवान' हा वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. जगभरातील शाहरुखच्या चाहत्यांमध्ये 'जवान' या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे.
शाहरुख खान हा बॉक्स ऑफिसचा बादशाह आहे. त्याचा 'जवान' हा सिनेमा चौथ्या आठवड्यातही धमाकेदार कामगिरी करत आहे. 'जवान' हा सिनेमा रिलीज होऊन आता 24 दिवस पूर्ण झाले आहेत. रिलीजच्या 24 दिवसांत जगभरात या सिनेमाने 1055 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करेल, असे म्हटले जात आहे.
भारतीय बॉक्स ऑफिसवर 'जवान'चा बोलबाला (Jawan Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 389.88 कोटींची कमाई केली. दुसरा आठवड्यात 136.1 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 55.92 कोटींची कमाई केली. आता चौथ्या आठवड्यातही या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
- पहिला दिवस : 75 कोटी
- दुसरा दिवस : 53.23 कोटी
- तिसरा दिवस : 77.83 कोटी
- चौथा दिवस : 80.1 कोटी
- पाचवा दिवस : 32.92 कोटी
- सहावा दिवस : 26 कोटी
- सातवा दिवस : 23.2 कोटी
- आठवा दिवस : 21.6 कोटी
- नववा दिवस : 19.1 कोटी
- दहावा दिवस : 31.8 कोटी
- अकरावा दिवस : 36.85 कोटी
- बारावा दिवस : 16.25 कोटी
- तेरावा दिवस : 14.4 कोटी
- चौदावा दिवस : 9.6 कोटी
- पंधरावा दिवस : 8.1 कोटी
- सोळावा दिवस : 7.6 कोटी
- सतरावा दिवस : 12.25 कोटी
- अठरावा दिवस : 14.95 कोटी
- एकोणिसावा दिवस : 5.4 कोटी
- विसावा दिवस : 4.9 कोटी
- एकविसावा दिवस : 4.85 कोटी
- बाविसावा दिवस : 5.97 कोटी
- तेविसावा दिवस : 5.5 कोटी
- चोविसावा दिवस : 9.25 कोटी
- एकूण कमाई : 596.20 कोटी
भारतात 'जवान'चा बोलबाला
'जवान' या बहुचर्चित सिनेमाचा भारतात बोलबाला आहे. किंग खानचे चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. 'जवान' हा सिनेमा लवकरच 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. अॅटली कुमार (Atlee Kumar) दिग्दर्शित 'जवान' या सिनेमात शाहरुखसह (Shah Rukh Khan), विजय सेतुपती (Vijay Sethupathi), नयनतारा (Nayanthara), सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) आणि प्रियामणी (Priyamani) मुख्य भूमिकेत आहेत. तसेच संजय दत्त आणि दीपिका पदुकोणची झलकही या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा तुफान कमाई करत आहे. आता 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे.
संबंधित बातम्या