Jawan : 'किंग खान'च्या 'जवान'चा विक्रम! अॅडव्हान्स बुकिंगमध्येच रेकॉर्ड ब्रेक कमाई! 2 लाख तिकीटांचा टप्पा पार
Jawan Advance Booking : शाहरुख खानचा जवान चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकींगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
Shah Rukh Khan Jawan Advance Booking : बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख (Shah Rukh Khan) लवकरच 'जवान' (Jawan Movie) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'जवान'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते आतूर असून तिकीट खरेदीही (Jawan Movie Advance Booking) रेकॉर्ड ब्रेक सुरु आहे. जवान चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींग 1 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. जवान चित्रपटाने अॅडव्हान्स बुकींगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'जवान' चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच 'पठाण' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा विक्रम
जवान चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगचा नवीन आकडा समोर आला आहे. रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवान चित्रपटाची 2 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो बुकींगवर चाहत्यांचा भर असून पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) ची 168,000 तिकीटे आणि सिनेपॉलिस (Cinepolis) मध्ये 35,300 तिकीटांची अॅडव्हान्स बुकींग झाली आहे. आतापर्यंत एकूण पहिल्या दिवशीसाठी 2,03,300 तिकीटांची अॅडव्हान्स बुकींग झाली आहे.
#Jawan ADVANCE BOOKING STATUS
— taran adarsh (@taran_adarsh) September 3, 2023
NOTE: Tickets sold for *Thu* / *Day 1* at NATIONAL CHAINS… Update: Sun, 12 noon
⭐️ #PVR + #INOX: 168,000
⭐️ #Cinepolis: 35,300
⭐️ Total: 203,300 tickets sold 🔥🔥🔥#SRK #Nayanthara #VijaySethupathi #DeepikaPadukone
'जवान' 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार
शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. दुबईतील बुर्ज खलीफावर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला हा सिनेमा 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अॅडव्हान्स बुकींगमध्येच दणदणीत कमाई
'जवान'ने (Jawan) फर्स्ट डे फर्स्ट शो साठी (Jawan First Day First Show) अॅडव्हान्स बुकिंग (Jawan Advance Booking) सुरू होताच पहिल्या 24 तासांत तीन लाखांपेक्षा अधिक कमाई केली आहे. शाहरुखच्या 'पठाण' या कमबॅक सिनेमाने भारतात 70 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता 'जवान' किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'जवान' हा सिनेमा 'गदर 2' आणि 'पठाण' पेक्षा अधिक कमाई करू शकतो असे म्हटलं जात आहे. अॅडव्हान्स बुकींगमध्येच सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे.
संबंधित बातम्या