एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Health Update: उष्माघाताच्या त्रासानंतर शाहरुख खान रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?  जुही चावलाने दिली हेल्थ अपडेट 

Shah Rukh Khan Health Update: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची प्रकृती काल बिघडली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याचे हेल्थ अपडेट समोर आले आहेत. 

Shah Rukh Khan Health Update: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची (Shah Rukh Khan) प्रकृती काल अचानक खालावली. त्याला उष्माघानंतर त्याला तात्काळ अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीची चिंता लागली होती. पण आता त्याच्या प्रकृतीसंदर्भात माहिती समोर येत आहे. त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री चुही चावला (Juhi Chawla) हिने किंग खानच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

शाहरुख खानची तब्येत आता कशी आहे?

 न्यूज 18 शी बोलताना जुही चावलाने सांगितले की, शाहरुख खानची तब्येत आता सुधारत आहे आणि त्याला बरे वाटत आहे. शाहरुखसोबत जुही चावला आणि तिचा पती जय मेहता हे देखील आयपीएल टीम केकेआरचे  मालक आहेत. काल म्हणजे बुधवार 22 मेर रोजी संध्याकाळी जूही चावला देखील शाहरुखसोबत रुग्णालयात होती. पण बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. 

पुढे जुहीने म्हटलं की, काल रात्री शाहरुखची तब्येत ठीक नव्हती, पण त्याची काळजी घेतली जात आहे आणि आता त्याला बरे वाटत आहे. तो लवकरच बरा होईल आणि फायनलमध्ये आमच्या टीमला चिअरअप करतानाही दिसेल. जुहीने दिलेल्या अपडेटमुळे शाहरुखच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला आहे. 

शाहरुख रुग्णालयात दाखल

सध्या आयपीएल हंगामात व्यस्त असलेला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला (Shahrukh Khan) रुग्णालयात दाखल करण्या आलं. कडाक्याच्या उन्हामुळे त्याला त्रास होत असल्याने प्रकृती अस्वास्थतेमुळे शाहरुखला अहमदाबादमधील केडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायजर्सं यांच्यात मंगळवारी आयपीएलच्या (IPL) हंगामातील क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात शाहरुख खानची मालकी असलेल्या केकेआरने बाजी मारली. त्यानंतर, शाहरुखने स्वत: मैदानात फिरुन चाहत्याचे अभिवादन केले होते. तसेच, केकेआरच्या विजयाचा जल्लोषही साजरा केला होता. मात्र, उष्माघातामुळे शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

विजयानंतर शाहरुखच्या टीमचा जल्लोष

आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली. त्यांनी हैदराबादचा अख्खा डाव 159 धावांत गुंडाळला. त्यामुळं कोलकात्यासमोर विजयासाठी केवळ 160 धावांचं आव्हान होतं. कोलकात्यानं तब्बल 38 चेंडू आणि आठ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठलं.

ही बातमी वाचा : 

Shah Rukh Khan Hospitalized: कोलकाताच्या विजयाचा जल्लोष; शाहरुख खान दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget