Shah Rukh Khan : दोन मिनिटाच्या शूटसाठी किंग खानने घालवलेत तब्बल सहा तास; 'डंकी'बद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली
Dunki Shooting : सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'डंकी' या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे.
Shah Rukh Khan Dunki Movie Shooting : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. 'डंकी'आधी 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) हे शाहरुखचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यास सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. दोन सिनेमे यशस्वी झाल्यानंतर आता तिसऱ्या सिनेमासाठीही किंग खानने खूप मेहनत घेतली आहे.
शाहरुखच्या आगामी 'डंकी' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमात अभिनेता अजय कुमार एक छोटी भूमिका साकारत आहे. दरम्यान एका मुलाखतीत अजय म्हणाला,"चार ओळीच्या एका शॉट साठी किंग खानने अनेक तास मेहनत घेतली आहे. कित्येक टेक दिले आहेत. एक शॉट परफेक्ट देण्यासाठी तो चांगलीच मेहनत घेत आहे".
एका सीनसाठी शाहरुखने घालवलेत सहा तास
अजय कुमार पुढे म्हणाला,"सिनेमातील एक सीन फक्त दोन मिनिटांचा होता. पण हा सीन परफेक्ट करण्यासाठी शाहरुखने तब्बल सहा तास मेहनत घेतली आहे. तसेच शाहरुखने माझ्यासोबत या सीनची 20-25 मिनिटे तालिमदेखील केली आहे. 25 वेगवेगळ्या व्हेरिएशनचा हा सीन आहे. हा सीन शूट होईपर्यंत सहा तास किंग खान त्यावर खूप मेहनत घेत होते".
शाहरुखच्या 'डंकी'बद्दल जाणून घ्या...
शाहरुखच्या 'पठाण', 'जवान' या सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं आहे. आत त्याचा 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज आहे. वर्षाच्या शेवटी 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणार आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासाठी किंग खानने चांगलच मानधन घेतलं आहे.
शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'डंकी' या सिनेमात शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन ईरानी आणि सतीश शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'डंकी'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान 'डंकी' या सिनेमात 'हार्डी' हे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याने 28 कोटी रुपयांचा मानधन घेतलं आहे. 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawaan) सिनेमासाठीही अभिनेत्याने एवढं मानधन घेतलं होतं.
संबंधित बातम्या