Shah Rukh Khan : मधुचंद्राच्या रात्रीच ढसाढसा रडला होता शाहरुख खान,खोलीत बायकोला एकटीलाच सोडून गेला अन्...
Shah Rukh Khan Cried In Front Of Gauri Khan: शाहरुख खानच्या वैयक्तिक आयुष्यातला एक किस्सा सध्या बराच चर्चेत आलाय.
Shah Rukh Khan Cried In Front Of Gauri Khan: बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता असण्यासोबतच लोकप्रिय अभिनेता म्हणूनही शाहरुखची (Shah Rukh Khan) ओळख आहे. शाहरुख खानने बॉलिवूडमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले असून हा प्रवास 32 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वारंवार त्याचं काम आणि वैयक्तिक आयुष्य हे चर्चेत आलं आहे.
शाहरुखसोबतच त्याची पत्नी गौरी खान देखील बरीच चर्चेत असते.इंटिरियर डिझायनर असण्यासोबतच ती निर्माती देखील आहे. गौरी खानसोबत शाहरुखने 1991 मध्ये लग्न केलं होतं. पण मधुचंद्राच्या रात्रीच तो त्याच्या बायकोला खोलीत एकटीला सोडून गेला होता. पण त्या रात्री त्याने परत येऊन जेव्हा गौरीची अवस्था पाहिली त्यावेळी तो ढसाढसा रडू लागला होता.
सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता शाहरुख
शाहरुख खानने गौरीशी लग्न केले तेव्हा तो बॉलिवूडमधील त्याचा सुरुवातीचा टप्पा होता. त्यावेळी त्याचा संघर्षाचा काळ सुरु होता आणि तो 'दिल आशना है' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका हेमा मालिनी होत्या. शाहरुख आणि गौरीचे लग्न मुंबईबाहेर झाले होते.
शाहरुख त्या काळात मुंबईत एका फ्लॅटमध्ये राहत होता. मात्र शाहरुखच्या मित्राने त्याच्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. जेव्हा गौरी आणि शाहरुख लग्न करून परतले तेव्हा शाहरुखला वाटले की आपण हेमा मालिनी यांना मुंबईत आल्याचे सांगावे. त्यांनी ही बातमी हेमाला दिली. मात्र हेमा मालिनी यांनी त्यांना लगेच सेटवर येण्यास सांगितले होते.
शाहरुखने सांगितला 'तो' किस्सा
हेमा मालिनी यांनी बोलावल्यानंतर शाहरुख पत्नी गौरीसोबत सेटवर पोहोचला. मात्र, हेमा सेटवर हजर नव्हती. बराच वेळ हेमाची वाट पाहिली पण ती आली नाही. त्यानंतर अभिनेत्याने पत्नीला मेकअप रूममध्ये बसवले. तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. मात्र यानंतर शाहरुख खान रात्री 2 वाजता परतला.
दागिने आणि मेकअप तसाच ठेवून गौरी तिथल्याचं एका खुर्चीवर बसल्याबसल्या झोपली होती. आपल्या लग्नाच्या रात्रीचा किस्सा सांगताना शाहरुख म्हणाला होता, त्या दिवशी मला माझ्या निर्णयाचा खूप राग आला होता. आमच्या लग्नानंतरची ती पहिली रात्र होती, ज्या दिवशी गौरीला खूप मच्छर असलेल्या खोलीमध्ये वाट पाहत घालवावी लागली होती. मी गौरीला उठवलं आणि तिला काहीच न बोलता हॉटेलच्या रुमवर घेऊन आलो. त्या रात्रीची माझ्या आयुष्यात खूप मोठी भूमिका होती.