एक्स्प्लोर
शाहरुख-अनुष्का तिसऱ्यांदा एकत्र, सिनेमाचं नाव...
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान आणि अनुष्का शर्मा यांच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. इम्तियाज अलीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचं नाव आहे 'जब हॅरी मेट सेजल'. चित्रपटात शाहरुख-अनुष्का तिसऱ्यांदा तर शाहरुख-इम्तियाज पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख आणि अनुष्काची जोडी तिसऱ्यांदा प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. 2008 मधील अनुष्काचा डेब्यू असलेला 'रब ने बना दी जोडी' आणि 2012 मध्ये प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दर्शित अखेरचा चित्रपट 'जब तक है जान'मध्ये दोघं झळकले होते.
इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेल्या सहा चित्रपटांमध्ये शाहरुखसोबतचा त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.
चित्रपटात शाहरुख पंजाबमधील टुरिस्ट गाईडची भूमिका साकारत आहे, तर अनुष्का गुजराती युवतीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचं शूटिंग बुडापेस्ट, पंजाब आणि प्रागमध्ये प्रामुख्याने झालं आहे.
'रणबीर कपूरने कधी दावा केलाच तर लक्षात ठेवा, जब हॅरी मेट सेजल हे शीर्षक त्याने सुचवलं नाही. त्यामुळे त्याला पाच हजार रुपयांचं बक्षीस मिळत नाही.' असं ट्वीट शाहरुखने केलं आहे. https://twitter.com/iamsrk/status/872925570698420224 हॉलिवूड मूव्ही 'व्हेन हॅरी मेट सॅली'शी शाहरुखच्या या चित्रपटाचं नामसाधर्म्य आहे. त्यामुळे कथानकातही साम्य असणार, की नाही हे लवकरच उलगडेल.:) A post shared by Imtiaz Ali (@imtiazaliofficial) on
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement