Shah Rukh Khan :ठरलं तर मग! शाहरुखने जाहीर केलं आर्यनचं पदार्पण, पण किंग खानचा मुलगा अभिनेता नाही तर बॉलिवूडमध्ये निभावणार 'ही' भूमिका
Shah Rukh Khan Announces Aryan Khan Debut:शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यन खानच्या पदार्पणाची घोषणा केली आहे.

Shah Rukh Khan Announces Aryan Khan Debut: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहानानंतर (Suhana Khan) आता त्याचा मुलगा आर्यन खानही (Aryan Khan) बॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखने नुकतीच आर्यन खानच्या पदार्पणाची घोषणा केली आहे. आर्यन खान लवकरच दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. आर्यन खानने दिग्दर्शित केलेली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आर्यन खान दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेली वेब सिरीज 2025 मध्ये OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही सीरिज शाहरुख खान आणि गौरी खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवली जात आहे. नेटफ्लिक्सने या संदर्भात अधिकृत माहिती देत आर्यनच्या पदार्पणाची पुष्टी केली आहे.
नेटफ्लिक्सने शेअर केली पोस्ट
नेटफ्लिक्सने त्यांच्या निवेदनात म्हटलं की, 2025 मध्ये नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट गौरी खान निर्मित आणि आर्यन खान दिग्दर्शित अनोख्या बॉलिवूड सीरिजसाठी एकत्र आले आहेत. नेटफिक्सवर बॉलिवूडमधली अशी कलाकृती याआधी कधीही पाहिली नसेल. आर्यन खान दिग्दर्शित करत असलेली नवी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहरुख खाननेही शेअर केली पोस्ट
शाहरुख खाननेही त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, हा एक खास दिवस आहे.. जेव्हा प्रेक्षकांसमोर एक नवीन कथा सादर केली जातेय.. आजचा दिवस आणखी खास आहे कारण रेड चिलीज आणि आर्यन खानने त्याच्या नवीन सीरिजचा प्रवास सुरु केला आहे. अप्रतिम गोष्ट आहे ... आर्यन असाच पुढे जात रहा आणि लोकांचं मनोरंजन करत रहा...
It’s a special day when a new story is being presented for the audience. Today is even more special as @RedChilliesEnt and Aryan Khan embark on their journey to showcase their new series on @NetflixIndia . Here’s to untamed story telling….controlled chaos…gutsy scenes and lots… pic.twitter.com/8v0eBzRZ6S
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 19, 2024
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

