एक्स्प्लोर
दंगलसाठी आमीरने तब्बल 30 किलो वजन वाढवलं आणि घटवलं
![दंगलसाठी आमीरने तब्बल 30 किलो वजन वाढवलं आणि घटवलं See Here How Aamir Gain And Lose 30 Kg Weight For Dangal दंगलसाठी आमीरने तब्बल 30 किलो वजन वाढवलं आणि घटवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/29114737/amir-dangal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : साधं 3 किंवा 4 किलो वजन वाढवणं वा कमी करणं अवघड होऊन बसतं. उत्साहाच्या भरात काही आठवडे जिम लावली जाते. नंतर मात्र संकल्प पार धुळीस मिळतो.
पण, मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने 'दंगल' सिनेमासाठी तब्बल 30 किलो वजन वाढवलं आणि त्यात घट सुद्धा केली.
'दंगल' सिनेमात आमीरने पैलवान महावीर फोगट यांची भूमिका साकारण्यासाठी स्वतःचं वजन तब्बल 97 किलो इतकं केलं होतं. नंतर वजन कमी करणं अवघड होईल की काय, असंही आमीरला वाटलं. मात्र सातत्य आणि इच्छेच्या जोरावर त्यानं ते शक्यही केलं.
'दंगल' सिनेमा 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. यामध्ये आमीरने पैलवान महावीर फोगट यांची भूमिका साकारली आहे. आमीरने दंगलच्या ट्रेनिंगचा हा व्हिडिओ काल रिलीज केला.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)