Sonu Nigam : कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने सोडलं मौन; म्हणाला, "ती व्यक्ती जबरदस्तीने"
Sonu Nigam : सोनू निगमला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे.
Sonu Nigam Attacked : चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert) लोकप्रिय गायक सोनू निगमला (Sonu Nigam) धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्काबुक्कीदरम्यान सोनूच्या टीममधील एक मुलगा स्टेजवरुन खाली पडल्याने जमखी झाला आहे. आता याप्रकरणी सोनू निगमने मौन सोडलं आहे.
सोनू निगम काय म्हणाला?
सोनू म्हणाला, "लाईव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरुन खाली उतरत होतो. त्यावेळी स्वप्नील प्रकाश फातर्फेकर नामक एका व्यक्तीने मला जबरदस्तीने जोरात खेचलं. त्यामुळे मला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या माझ्या टीममधील हरी आणि रब्बानीला त्याने धक्काबुक्की केली. दरम्यान, मीदेखील पायऱ्यांवर पडलो. आता याप्रकरणी मी पोलिसांत (Chembur Police) तक्रार दाखल केली आहे".
After the concert, I was coming down from stage when a man Swapnil Prakash Phaterpekar held me. Then he pushed Hari & Rabbani who came to save me. Then I fell on steps. I filed a complaint so that people should think about forcefully taking selfies & causing scuffle: Sonu Nigam https://t.co/RVFONXeQ79 pic.twitter.com/JxtfCVIaQj
— ANI (@ANI) February 20, 2023
Police register case in scuffle during singer Sonu Nigam's concert in Mumbai's Chembur, say one booked
— ANI Digital (@ani_digital) February 20, 2023
Read @ANI Story |https://t.co/jORqgubIK7#sonunigam #scuffle #chembur pic.twitter.com/UT2f786jO9
पोलीस काय म्हणाले?
मुंबईतील जेन रुग्णालयातील सोनू (Sonu Nigam) आणि पोलिसांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सोनू निगम धक्काबुक्की प्रकरणावर बोलताना डीसीपी म्हणाले, "लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगम स्टेडवरुन खाली उतरत असताना एका व्यक्तीने सोनूला पकडलं. यावर सोनूने आक्षेप घेतल्यानंतर सोनूसह त्याच्या टीममधील दोन जणांना त्या व्यक्तीने पायऱ्यांवरुन जोरात ढकललं. आता यातील एक जण जखमी असून सोनूला दुखापत झालेली नाही".
डीसीपी पुढे म्हणाले, "सोनू निगमसोबत झालेल्या चर्चेनुसार जाणूनबुजून धक्काबुक्की करण्यात आलेली नाही. धक्काबुक्की करण्याचा कोणाचा हेतू नव्हता. फक्त एका व्यक्तीच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. धक्काबुक्की झाल्यानंतर लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यामुळे फक्त एका व्यक्तीवरचं तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनू निगमसोबत फक्त एक सेल्फी घेण्यासाठी आरोपीने धक्काबुक्की केली होती."
महत्त्वाच्या इतर बातम्या :