'सत्यप्रेम की कथा' नं वीकेंडला बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; चौथ्या दिवशी चित्रपटानं किती कमाई केली? जाणून घ्या
'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटानं रविवारी (2 जुलै) किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...
Satyaprem Ki Katha BO Collection Day 4: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सोशस मीडियावर अनेक जण पोस्ट शेअर करुन 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचं कौतुक करत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं रविवारी (2 जुलै) किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटानं पहिल्या दिवशी 9.5 कोटी रुपये कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7 कोटींचा व्यवसाय केला. पण वीकेंडला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला शनिवारी चित्रपटाने 10.10 कोटींचे कलेक्शन केले होते. आता रविवारी (2 जुलै) या चित्रपटानं 12 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई 38.35 कोटी झाली आहे.
अभिनेत्री कियारा आडवाणीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसले की, 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट पाहून झाल्यावर स्टँडिंग ओव्हेशन दिलं. कियारानं या व्हिडीओ कॅप्शन दिलं, 'जेव्हा प्रेक्षक स्टँडिंग ओव्हेशन देतात, तेव्हा तुम्हाला समजते की चित्रपटाची जादू निर्माण झाली आहे कायम लक्षात राहिल असा क्षण.'
View this post on Instagram
समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये कार्तिक आणि कियारा यांच्यासोबतच सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तल्सानिया या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा भूल भूलैय्या-2 हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची कथा कार्तिक आर्यननं साकारलेल्या सत्यप्रेम आणि कियाराच्या कथा या भूमिकेच्या भोवती फिरतो. या चित्रपटाच्या कथानकाचे अनेक जण कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या