Satyaprem Ki Katha: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या कमाईत घसरण; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई
'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha ) हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Satyaprem Ki Katha BO Collection Day 2: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. सत्यप्रेम की कथाने रिलीजच्या दुस-या दिवशी किती कमाई केली? ते जाणून घेऊयात...
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटापूर्वी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी 'भूल भुलैय्या 2'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता त्यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे . रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 9.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (30 जून) या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.
तरण आदार्श यांच्या ट्वीटनुसार, शुक्रवारी (30 जून) 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने जवळपास 7 कोटींचे कलेक्शन केले असून आता या चित्रपटाची एकूण कमाई 16.25 कोटी एवढी झाली आहे. वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.
The working day [Fri] - immediately after the holiday [Thu] - impacted the earnings of #SatyaPremKiKatha on Day 2… Evening shows, however, saw good momentum at national chains… Thu 9.25 cr, Fri 7 cr. Total: ₹ 16.25 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2023
The #KartikAaryan - #KiaraAdvani starrer -… pic.twitter.com/mqwPWEYG98
चित्रपटामधील कलाकार
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये कार्तिक आणि कियारा यांच्यासोबतच सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तल्सानिया या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची कथा
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची कथा कार्तिक आर्यनच्या सत्यप्रेम आणि कियाराच्या कथा या भूमिकेच्या भोवती फिरतो. सत्यप्रेम हा त्याच्या करिअरमध्ये अपयशी ठरतो आणि त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याच्या लग्नाची तयारी करतात. त्यानंतर चित्रपटामध्ये कोणते ट्वीस्ट अँड टर्न येतात? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या