साऊथची कॉपी केलेला चित्रपट बॉलिवूडमध्ये ठरला फ्लॉप, अक्षय कुमारचा चित्रपट आता OTT वर होतोय ट्रेंड
Flop Film Trending On OTT : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होताना दिसत आहे.
Disaster Movie Trending On OTT : गेल्या काही वर्षात साऊथ चित्रपटसृष्टीचा दबदबा वाढला आहे. उत्तम कहाणी आणि दमदार ॲक्शन यांचा चांगला मेळ आणि प्रदर्शन साऊथ चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो. बॉलिवूड आजकाल ओरिजनल कंटेट देण्याऐवजी साऊथ चित्रपटांची रिमेक करण्याला जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेले आणि छप्परफाड कमाई केलेल्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवर रिमेक बनवून कमाई करण्याचा बॉलिवूड निर्मात्यांचा प्रयत्न आहे. असे असताना काही रिमेक चित्रपट चांगली कमाई करतात, तर काही बॉक्स ऑफिसवर चांगलेच आदळतात. असाच एक चित्रपट 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला.
साऊथ चित्रपटचा हिंदी रिमेक बॉलिवूडमध्ये ठरला फ्लॉप
मागील वर्ष अभिनेता अक्षय कुमारसाठी फार आव्हानात्मक ठरलं. या वर्षात अक्षय कुमारचे सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले. सरफिरा हा त्यातीलच एक चित्रपट. 2024 मध्ये अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 12 जुलै 2024 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 'सरफिरा' (Sarfira) हा चित्रपट साऊथ अभिनेता सूर्याच्या 'सोराराई पोट्टू' (Soorarai Pottru) चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. 'सरफिरा' चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत राधिका मदान, परेश रावल, सीमा बिस्वास हे कलाकारही झळकले होते.
फ्लॉप चित्रपटा आता OTT वर होतोय ट्रेंड
'सरफिरा' चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगरा यांनी केलं होतं, त्यांनीच 'सोराराई पोट्टू' चित्रपटही बनवला होता. 2020 मध्ये आलेल्या सोराराई पोट्टू चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कमाई केली. अभिनेता सूर्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र, याच्या हिंदी रिमेककडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटामुळे अक्षय कुमारवर आणखी एकदा फ्लॉपचा ठपका लागला. मात्र, बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला हा चित्रपट ओटीटीवर कमाल करताना दिसत आहे.
सरफिरा ओटीटीवर ट्रेंडिग टॉप 10 मध्ये पहिल्या क्रमांकावर
अक्षय कुमारचा सरफिरा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लसवर रिलीज झाला. यानंतर या चित्रपटाने ओटीटीवर कब्जा केला आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला सरफिरा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिग होताना दिसत आहे. हा चित्रपट सध्या भारतातील टॉप 10 चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. इतकंच नाहीतर ओटीटीवर टॉप 10 चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :