Sara Ali Khan Trolled: सारा अली खाननं आदित्य रॉय कपूरसोबत केला रॅम्प वॉक; नेटकरी म्हणाले, 'ओव्हर अॅक्टिंग'
रॅम्प वॉक करत असताना सारानं (Sara Ali Khan) दिलेल्या एक्सप्रेशन्सला नेटकरी ट्रोल करत आहेत.
Sara Ali Khan Trolled: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे फॅशन शोमध्ये तसेच विविध कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक करतात. सध्या इंडियन कॉउचर वीक 2023 सुरू आहे. ज्यामध्ये दररोज काही सेलिब्रिटी विविध डिझायनयारसाठी रॅम्प वॉक करत आहेत. अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हे सोमवारी रात्री या कार्यक्रमाचे शोस्टॉपर्स बनले. सारा आणि आदित्य यांनी शंतनू आणि निखिल या डिझाइनरसाठी वॉक केला. या कार्यक्रमात दोघेही एथनिक लूकमध्ये दिसले. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही नेटकरी या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन रॅम्प वॉक करत असताना सारानं दिलेल्या एक्सप्रेशन्सला ट्रोल करत आहेत.
सारानं इंडियन कॉउचर वीक 2023 साठी पीच आणि सिल्व्हर कलरचा लेहेंगा परिधान केला होता. तर आदित्य रॉय कपूरने पीच रंगाची शेरवानी आणि क्रीम पॅंट असा लूक केला होता. रॅम्प वॉकदरम्यान दोघांनीही अनेक पोज दिल्या. पण साराच्या एक्सप्रेशन्सला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
रॅम्प वॉक करताना सारा अली खानने दिलेले एक्सप्रेशन्स नेटकऱ्यांना आवडले नाहीत. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्यानं साराच्या रॅम्प वॉक व्हिडीओला कमेंट केली,'ओव्हरअॅक्टिंगसाठी साराचे 50 रुपये कट करा' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'साराचे एक्सप्रेशन्स विचित्र वाटत आहेत.'
View this post on Instagram
आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान यांचे आगामी चित्रपट
मेट्रो इन दिनों या चित्रपटामधून आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मेट्रो इन दिनों या चित्रपटामधील आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान यांची जोडी प्रेक्षकांना आवडणार की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
साराचा काही दिवसांपूर्वी 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. अतरंगी रे, केदारनाथ, लव्ह आज कल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांमधील साराच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Sara Ali Khan: 'ओरडू नका!'; फोटोग्राफर्स जोरजोरात ओरडू लागल्यावर वैतागली सारा, व्हिडीओ व्हायरल