(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Jadhav: 'दुनियादारीचं शूट सुरु असताना फोन आला अन्'; संजय जाधव यांनी सांगितली वडिलांची आठवण
एका मुलाखतीमध्ये संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली.
Sanjay Jadhav: दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या दुनियादारी (Duniyadari) या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. संजय जाधव यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण त्यांच्या दुनियादारी या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीमध्ये संजय जाधव यांनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली.
संजय जाधव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मी कामात खूप व्यस्त होतो. मला तेव्हा कुटुंबाला फार वेळ द्यायला जामत नव्हतं. एकदा अप्पा (वडील) मला म्हणाले की, माझ्या अंगठ्याची हालचाल होत नाही. तेव्हा माझा मित्र अमेय खोपकरनं मला हिंदुजा हॉस्पिटमध्ये अपॉइंटमेंट घेऊन दिली. मी तिथे अप्पांना घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी त्यांना चेक केलं. त्यानंतर डॉक्टर अप्पांना म्हणाले, आमचं हॉस्पिटल बघून या तुम्ही. त्यानंतर अप्पा बाहेर गेल्यावर डॉक्टर मला म्हणाले, दीढ वर्ष. तेव्हा मला कळालं नाही ते असं का म्हणाले? डॉक्टरांनी मला पुढे सांगितलं, त्यांना एक डिसिज झाला आहे. ज्यामुळे त्यांचा रोज एक ऑर्गन निकामी होईल. मला तरीही काही कळालच नाही. मी त्या डिसिजबद्दल माहिती शोधली. मी माझ्या वडिलांचा रोज एक निकामी होताना बघितलं.'
पुढे संजयनं सांगितलं, 'वडिलांना झालेल्या आजाराबद्दल काळाल्यानंतर मी वडिलांसोबत वेळ घालवत होतो. त्याच वेळी दुनियादारी चित्रपटाचं काम सुरु झालं होतं. दुनियादारीच्या शुटिंगसाठी मी पुण्याला गेलो. अप्पा एकदा प्रमिताला म्हणाले, मला जायचंय पण त्याचं शूटिंग संपू देत मग मी जातो. प्रमितानं मला हे फोन करुन सांगितलं की, अप्पा असं बोलत आहेत. मला कळत नव्हतं काय करावा. ज्यावेळी मी दुनियादारी चित्रपटामधील श्रेयस आणि त्याच्या वडिलांचा सीन मी शूट करत होतो. तेव्हाच मला प्रमिताचा फोन आला. प्रमिता म्हणाली, तू ये वडिलांची तब्येत ठिक नाहीये.'
संजयनं म्हणाला,'शूटिंग झाल्यानंतर मी हॉस्पिटमध्ये रात्री गेलो. तेव्हा ते झोपले होते. दुसऱ्या दिवशी मी सकाळी पुन्हा हॉस्पिटमध्ये गेलो. त्यावेळी त्यांनी डोळे उघडले त्यांनी मला बघितलं. त्या दिवशी ते मला सोडून गेले.'
फक्ता लढ म्हणाला, रिंगा रिंगा, चेकमेट, प्यार वाली लव्ह स्टोरी, गुरु या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे.संजय जाधव यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.
संबंधित बातम्या