मान्यता म्हणते, देवाने परीक्षेसाठी आम्हाला निवडलंय
अभिनेता संजय दत्तला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालंय. यानंतर त्याची पत्नी मान्यता हिने संजयच्या सर्व चाहत्यांसाठी एक स्टेटमेंट जारी केलंय.

मुंबई : अभिनेता संजय दत्तला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याच्या बातम्या मंगळवारी रात्रीपासून वाऱ्यासारख्या पसरल्या. मंगळवारी सकाळीच संजय दत्तने आपल्या सोशल मीडियावर आपण आता आपल्या कामापासून, सोशल मीडियापासून काही दिवस ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर त्याला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. आता तो पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा असतानाच त्याची पत्नी मान्यता दत्तने एक स्टेटमेंट जारी केलं आहे.
संजय दत्तला कर्करोग झाल्याचं निष्पन्न झाल्याचं कळल्यानंतर त्याची पत्नी मान्यता दत्तने तातडीने एक स्टेटमेंट जारी केलं आहे. संजय दत्तचे चाहते.. बॉलिवूडमधले त्याचे मित्र.. सोशल मीडियावर चालू असलेल्या चर्चा या सगळ्यांना विराम मिळावा म्हणून तिने हे स्टेटमेंट माध्यमांना दिलं आहे. त्या तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, संजयच्या प्रकृतीबाबत त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत, त्यांचे मी आभार मानते. देवाने पुन्हा एकदा आम्हाला परीक्षेसाठी निवडलं आहे. हा कठीण काळ आहे. संजयचे मित्र, त्याचे हितचिंतक आणि चाहत्यांची मी आभारी आहे. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. संजय लवकरच बरा होईल अशी आशा करूया. गेल्या भूतकाळात आम्ही सर्वच जण खूप वेगवेगळ्या अग्नदिव्यातून गेलो आहोत. हा काळही निघून जाईल. मी विनंती करते, की कृपया कोणत्याही अफवा पसरवू नका. संजू लढवय्या आहे. तो यातून बाहेर पडेल. तुमच्या प्रार्थना, शुभेच्छा पाठीशी असू द्या.'
संजय दत्तला अमेरिकेचा व्हिजा मिळणं अवघड; उपचारासाठी जाऊ शकतो सिंगापूरला
संजय दत्तला 8 ऑगस्टला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची कोविड टेस्टही झाली. ती निगेटिव्ह आली. त्यावेळी त्याला फुप्फुसाचा कर्करोग असल्याचं समोर आलं. हा कर्करोग थर्ड स्टेज कॅन्सर असल्याचं कळतं. संजय दत्तच्या प्रकृतीसाठी सर्वच चाहते आता प्रार्थना करू लागले आहेत.
Sanjay Dutt diagnosed with lung cancer | अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर






















