सुपरस्टार्सचा मुलगा, 1993 मध्ये ब्लॉकबस्टर, त्यानंतर 13 फ्लॉप सिनेमे, पण, 1999 मधल्या एका चित्रपटानं वाचवली कारकीर्द, ओळखलंत कोण?
Bollywood Actor Struggle: आजवर या सेलिब्रिटीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. पण, आयुष्यात त्यानं अनेक चढ उतारांचा सामनाही केला आहे. एवढंच काय? एका वादग्रस्त प्रकरणामुळे तुरुंगवासही भोगला आहे. तुम्ही ओळखलंत का?
Bollywood Actor Struggle Life : बॉलिवूडचा (Bollywood) खलनायक म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता म्हणजे, सुपरस्टार्सचा मुलगा. त्याच्या वडिलांनी त्याला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. पण, आयुष्यात त्यानं अनेक चढ उतारांचा सामनाही केला आहे. एवढंच काय? एका वादग्रस्त प्रकरणामुळे तुरुंगवासही भोगला आहे. तुम्ही ओळखलंत का? आम्ही कोणाबाबत बोलत आहोत? सुपरस्टार सुनिल दत्त (Sunil Dutt) आणि नर्गिस (Nargis Dutt) यांचा मुलगा संजय दत्त (Sanjay Dutt) बद्दल बोलत आहोत. म्हणजेच, फॅन्सचा लाडका संजूबाबा...
संजय दत्तच्या कारकिर्दीत सुरुवातीपासूनच अनेक चढ-उतार आले आहेत. एककाळ होता, ज्यावेळी त्याचे चित्रपट खूप चालायचे, पण त्यानंतर संजूबाबानं पडता काळही अनुभवला आहे. त्याच्या आयुष्यात एक वेळ अशीदेखील आली, ज्यावेळी त्याचं अख्खं करियर बरबाद झालं. त्यावेळी 1999 मध्ये संजय दत्तची भूमिका असलेल्या एका चित्रपटाने त्यांचे नशीब उजळले होतं. तो चित्रपट म्हणजे, वास्तव. आजही संजय दत्तचा हा चित्रपट मोठ्या आवडीनं पाहिला जातो.
तब्बल 13 फ्लॉप दिल्यानंतर एक चित्रपट हिट ठरला...
संजय दत्तनं करिअरच्या सुरुवातीपासूनच अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्याचे लागोपाठ 13 चित्रपट फ्लॉप ठरले. 1999 मध्ये लीड रोल साकारत संजूबाबानं वास्तव रुपेरी पडद्यावर साकारला आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी संजय दत्तला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यापूर्वी संजय दत्तनं 1993 मध्ये माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ स्टारर चित्रपट 'खलनायक' देखील केला होता. 1993 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होतो. खलनायक चित्रपटानं संजय दत्तला नवी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील एका गाण्यामुळे या चित्रपटाची बरीच बदनामी झाली. तरीही हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
View this post on Instagram
एक वेळ अशी आली की, अख्खं करिअर उद्धवस्त झालं...
संजय दत्तनं बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केलं. अनेक वेळा प्रेक्षकांना हसवण्यापासून रडवण्यापर्यंत आणि खलनायक बनून प्रेक्षकांना घाबरवण्यापर्यंत संजय दत्तची सगळी पात्रं आजही लोकांना आठवतात. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांचं नाव 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी जोडले गेलं. त्यादरम्यान संजय दत्तला अटक झाली आणि त्यामुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झालं. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी संजय दत्तनं वास्तव चित्रपट केला. या चित्रपटासाठी संजय दत्तला फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या चित्रपटानं अभिनेत्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. स्वत: संजय दत्त यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, तो वास्तवला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानतो.
याआधी संजय दत्तचे जवळपास 13 चित्रपट फ्लॉप झाले होते. यानंतर त्यांना 2000 साली फिल्मफेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. त्यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत सलमान खान (हम दिल दे चुके सनम), आमिर खान (सरफरोश), मनोज बाजपेयी (शूल) आणि अजय देवगण (हम दिल दे चुके सनम) यांची निवड झाली होती. पण अखेर बाजी संजूबाबानं मारली. हा पुरस्कार जिंकून संजय दत्तनं हे सिद्ध केलं होतं की, त्याच्या कारकिर्दीत चढ-उतार आले तरी, तो बॉलिवूडच्या शर्यतीत कायम आहे, असेल आणि राहील.
दरम्यान, त्यानंतर संजूबाबाचे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर गाजले. मुन्नाभाई एमबीबीएसचे, लगे रहो मुन्नाभाई, अग्नीपथ आणि संजय दत्तच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारलेला चित्रपट संजूला देखील प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :