Shaakuntalam First Look: ऐतिहासिक चित्रपटात झळकणार समंथा रुथ प्रभू, ‘शाकुंतलम’ची रिलीज डेट जाहीर!
Shaakuntalam First Look: समंथाचा नवा चित्रपट 'शाकुंतलम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज झाले होते.
![Shaakuntalam First Look: ऐतिहासिक चित्रपटात झळकणार समंथा रुथ प्रभू, ‘शाकुंतलम’ची रिलीज डेट जाहीर! Samantha Ruth Prabhu and Dev Mohan starrer Shaakuntalam historical movie First Look and release date declare Shaakuntalam First Look: ऐतिहासिक चित्रपटात झळकणार समंथा रुथ प्रभू, ‘शाकुंतलम’ची रिलीज डेट जाहीर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/98f3e639b6a456e31ca3e54fd89c73561663920108260373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shaakuntalam First Look: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपटांमुळे चर्चेत आहे. समंथाचा नवा चित्रपट 'शाकुंतलम' (Shaakuntalam) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज झाले होते. चित्रपटाचे हे पोस्टर पाहिल्यानंतर चाहते नवी अपडेट मिळवण्यासाठी उत्सुक झाले होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टरही रिलीज केले आहे.
गुणशेखर दिग्दर्शित 'शाकुंतलम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख चित्रपट निर्मात्यांनी जाहीर केली आहे. हा चित्रपट यावर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘शाकुंतलम’ या ऐतिहासिक चित्रपटात समंथा प्रभू मोठ्या पडद्यावर ‘शकुंतला’च्या भूमिकेत दिसणार आहे.
पाहा पोस्टर :
गुणशेखर दिग्दर्शित 'शाकुंतलम' हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे. याबाबत माहिती देताना अभिनेत्री समंथा प्रभूने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे हे मोशन पोस्टर पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रीचा हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत.
पौराणिक कथेवर आधारित चित्रपट
समंथा प्रभूचा 'शाकुंतलम' हा आगामी चित्रपट कवी कालिदास यांच्या 'शाकुंतलम' या पौराणिक कथेवर आधारित आहे. यामध्ये शकुंतला आणि दुष्यंत यांची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ‘राजकुमारी शकुंतला’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, अभिनेता देव मोहन ‘राजा दुष्यंत’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून एक स्टारकिड मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन याची मुलगी अल्लू अर्हा राजकुमारीची भूमिका साकारणार आहे.
दिग्गज कलाकारांची फौज
समंथा आणि देव मोहन स्टारर या चित्रपटाची निर्मिती फेब्रुवारी 2021मध्ये सुरू झाली होती आणि अखेर आता हा चित्रपट पूर्ण झाला आहे. ‘शाकुंतलम’ हा चित्रपट यावर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘शाकुंतलम’ या चित्रपटात सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. एम. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला आणि जिशु सेनगुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)