Sam Bahadur Box Office Collection Day 5: अॅनिमलच्या वादळातही 'सॅम बहादुर'ची निकराची लढत; केली इतक्या कोटींची कमाई
Sam Bahadur Box Office Collection Day 5: सॅम बहादुर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन...
Sam Bahadur Box Office Collection Day 5: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अॅनिमल (Animal) या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. अॅनिमल या चित्रपटाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशताच सॅम बहादुर या चित्रपटानं देखील चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन...
‘सॅम बहादूर’ हा चित्रपट फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं पाच दिवसात 32.55 कोटींची कमाई केली आहे.
‘सॅम बहादूर’ चित्रपटाची कमाई (Sam Bahadur Box Office Collection Day 5)
'सॅम बहादुर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ओपनिंग-डेला 6.25 कोटींचे कलेक्शन केलं. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 9 कोटींची कमाई केली, तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 10.3 कोटींची कमाई केली, त्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घट झाली. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 3.5 कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी या चित्रपटानं 3.50 कोटींची कमाई केली आहे. आता पाच दिवसात या चित्रपटाची एकूण कमाई 32.55 एवढी झाली आहे.
View this post on Instagram
'सॅम बहादुर' चित्रपटाची कास्ट
मेघना गुलजार यांनी 'सॅम बहादुर' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सॅम मानेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका सान्या मल्होत्रानं साकारली आहे. अभिनेत्री फातिमा सना शेखनं या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंह बुंदेला या कलाकारांनी देखील या चित्रपट महत्वाची भूमिका साकारली आहे.
सॅम बहादुर या चित्रपटाची 'अॅनिमल' या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. अॅनिमल या चित्रपटाचं दिग्दर्शनसंदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केलं आहे.'अॅनिमल' या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: