एक्स्प्लोर
सलमानचं आवाहन, हा व्हिडीओ पाहा!

मुंबई: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. मात्र अभिनेता सलमान खानने शेअर केलेला व्हिडीओतून, देशातील किती लोक या उत्साहात खरोखरच सहभागी झाले आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सलमानने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक लहान मुलगा हातात झेंडे घेऊन प्रत्येकाला हॅप्पी रिपब्लिक डे अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहे. मात्र चारचाकी गाडीतील असो किंवा चकाचक इमारतीतील लोक ना त्याच्या हातातील झेंडा घेतात ना त्याच्या शुभेच्छा स्वीकारतात.
मात्र एक वयस्कर व्यक्ती चिमुकल्याच्या हातातील झेंडा घेऊन, त्याला पैसे देऊ करते. मात्र तो मुलगा पैसे नाकारतो आणि मी केवळ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहे, असं सांगून निघून जातो.
VIDEO:
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/824541760239996929
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















