Salman Khan Wedding : पन्नाशी ओलांडल्यानंतर सलमान खान लग्नासाठी तयार? म्हणाला,"आता माझे आई-वडील देखील..."
Salman Khan : सलमान खानने नुकतच एका कार्यक्रमात लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
Salman Khan Wedding : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. नुकताच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भाईजानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो लग्नाबद्दल भाष्य करताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
सलमान खानने नुकतचं रजत शर्माच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच लग्नाबद्दलदेखील मनमोकळेपणाने त्याने भाष्य केलं.
रजत शर्माने सलमानला विचारलं की, तू लग्न कधी करणार आहेस? यावर उत्तर देताना दबंग खान म्हणाला,"देवाच्या मनात येईल तेव्हा माझं लग्न होईल. आधी लग्नासाठी मी हो म्हणायचो तेव्हा समोरची व्यक्ती नाही म्हणायची. नंतर समोरची व्यक्ती हो म्हणू लागली पण मी नकार देऊ लागतो. आता हे दोन्ही बाजूने होत नाही. जेव्हा दोन्ही बाजूने होकार येईल तेव्हा मी लग्न करेल. अजून वेळ आहे. आता मी ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडेल त्या व्यक्तीसोबतच मी संसार थाटणार".
Bhai On His Marriage 🥹#SalmanKhanInAapKiAdalat pic.twitter.com/tmP4KuTucK
— DeviL PaSha 🚬 (@iBeingAli_Pasha) April 29, 2023
रजत शर्मा पुन्हा विचारतो,"लग्न करण्याचा तुझा काही प्लॅन असेल तर सांग". यावर उत्तर देत सलमान म्हणतो,"माझ्यावर आता खूप दबाव येत आहे. माझे पालकदेखील आता लग्न करण्याबद्दल माझ्यावर दबाव टाकत आहेत. त्यामुळे थोडंसं दडपण आलं आहे".
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दबंग खानने सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर आहेत. अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत अभिनेत्याच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती. पण त्यानंतरही त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. सलमान खान नक्की कोणासोबत लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सलमानचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा रिलीज झाल्याने ते सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत.
संबंधित बातम्या