(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : शेवटी स्वभाव नडला, भाईजाननं गमावलेला चित्रपट आमिरनं केला; बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला
Salman Khan : सलमानच्या स्वभावामुळे त्याच्या हातातून एक ब्लॉकबस्टर सिनेमा गेला. या चित्रपटात सलमानच्या नावाचा विचार झाला होता. मात्र, त्यानंतर आमिर खानची वर्णी लागली.
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान असलेला अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा आपल्या तापट स्वभावामुळे देखील ओळखला जातो. सलमानच्या या स्वभावामुळे अनेक सहकलाकार सेटवरदेखील त्याच्यासोबत बोलताना दबकून असल्याची चर्चा असते. सलमानच्या स्वभावामुळे त्याच्या हातातून एक ब्लॉकबस्टर सिनेमा गेला. या चित्रपटात सलमानच्या नावाचा विचार झाला होता. मात्र, त्यानंतर आमिर खानची वर्णी लागली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तामिळ चित्रपटाचा रिमेक असणारा 'गझनी' हा चित्रपट सलमानच्या हातातून त्याच्या हातातून गेला. या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणारा अभिनेता प्रदीप रावत यानेच ही माहिती दिली आहे.
सलमानच्या नावाची होती चर्चा....
'गझनी' हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत धुमाकूळ घातल्यानंतर दिग्दर्शक ए.आर.मुरुगदास यांनी या चित्रपटाचा हिंदीत रिमेक बनवण्याचा विचार केला होता. त्यादृष्टीने त्यांनी चित्रपटाच्या कास्टिंगचाही विचार सुरू केला.
'गझनी' या चित्रपटात खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते प्रदीप रावत यांनी या चित्रपटाबद्दल किस्सा सांगितला आहे. गझनीमध्ये आमिर खानने साकारलेली मुख्य व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. मात्र, मुख्य भूमिकेसाठी वेगळ्याच अभिनेत्याचं आमिर खान याच्या ऐवजी सलमान खानच्या नावाची चर्चा होती असा दावा रावत यांनी केला.
सलमानचा स्वभाव आड आला...
अभिनेते प्रदीप रावत यांनी सांगितलं की, या चित्रपटातील भूमिकेसाठी सलमान खानच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यावेळी सलमान ऐवजी आमिर खानचे नाव सुचवलं. सलमान खानचा स्वभाव रागीट आहे. तर, आमिर खानचा स्वभाव शांत आहे. चित्रपटासाठी सलमानऐवजी आमिरचे नाव सुचवले. अखेर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे रावत यांनी सांगितले.
आमिरचेच नाव का सुचवलं?
प्रदीप रावत यांनी आमिर खानसोबत सरफरोश चित्रपटात काम केले होते. त्यांनी सांगितले की, मला वाटलं की गझनीतील भूमिकेसाठी आमिर खानच योग्य पर्याय ठरेल. आमिरचा स्वभाव शांत असून तो सगळ्यांसोबत आदराने वागतो. मागील 25 वर्षाच्या कारकिर्दीत मी कधीही आमिर खानला इतर सहकलाकारांवर आरडाओरड करताना पाहिले नाही. त्याने कोणालाही कधीही अपशब्द वापरले नाहीत. त्यामुळे स्वभावाचा विचार करता सलमानला आवरता येऊ शकत नाही. त्यामुळे विनाकारण अनेक अडचणी निर्माण होतील असेही प्रदीप रावत यांनी सांगितले.
गझनी चित्रपटाची स्टारकास्ट काय होती?
'गजनी' हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट होता. ए.आर. मुरुगदास यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातून मुरुगदास यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात आमिर खान शिवाय असिन, जिया खान आणि प्रदीप रावत यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाद्वारे असिनने हिंदी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. मूळ तामिळ चित्रपटातही तिने भूमिकास साकारली होती.