Salman Khan : आईसोबत प्रेमाचे क्षण, भाच्यांसोबत घालवला निवांत वेळ, भाईजानच्या 'फॅमिली मॅन' व्हिडिओनं जिंकली चाहत्यांची मनं
Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
Salman Khan with His Mother : बॉलीवूडचा (Bollywood) भाईजान अर्थातच सलमान खानचा (Salman Khan) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अनेक व्हिडिओ आणि पोस्टवर चाहते भरभरुन प्रेम करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या असाच एक सलमान व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा दमदार अभिनय आणि डॅशिंग लूक यामुळे तो नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. नुकताच त्याचा कतरिना कॅफसोबत टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
सलमान जसा त्याच्या कामामुळे नेहमी चर्चेत असतो, तसाच तो त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याच्या कुटुंबासोबत त्याची असेलली अटॅचमेंट ही विशेष करुन चाहत्यांच्या पसंतीस पडते. सलमान अनेकदा त्याच्या कुटुंबासोबत छान आणि निवांत वेळ घालवताना दिसतो. सध्या असाच एक व्हिडिओ चाहत्यांची मनं जिंकत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या आईवर प्रेमाचा वर्षाव करत असल्याचं पाहायला मिळतो.
आईसोबत घालवले प्रेमाचे क्षण
सलमान खानने त्याच्या ऑफीशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या लेटेस्ट आऊटींगचा व्हिडिओ शेअर केलाय. सलमान हा सध्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) च्या 10 व्या सिजनसाठी युएईमध्ये आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सलमान हा टीम मुंबई हिरोजला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरताना दिसत आहे. डेनिम जीन्स आणि ब्ल्यू कलरच्या शर्टमध्ये सलमान नेहमीसारखाच डॅशिंग दिसत होता. त्याच्या शर्टवर संघाचा लोगोही छापण्यात आला होता. पण याशिवाय सलमानचा त्याच्या आईसोबतचा व्हिडिओ विशेष लक्ष वेधून घेत आहे. तसेच त्याची आईदेखील सलमानवर प्रेम करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.
View this post on Instagram
भाच्यांसोबत घालवला वेळ
या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याचा भाचा अहिल आणि भाची आयतसोबत मस्ती करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दोन लहान मुलं त्यांच्या मामाशी गप्पा मारताना आणि त्यांना स्वतःच्या हाताने फ्रेंच फ्राईज खायला घालताना पाहायला मिळालं. मामूची त्याच्या भाच्या आणि भाचीसोबतची मस्ती चाहत्यांची मनं जिंकत आहे. व्हिडिओच्या शेवटी, सलमान त्याच्या चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे.