(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kabhi Eid Kabhi Diwali : सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाचं नाव पुन्हा बदललं? आता 'हे' असू शकतं सिनेमाचं टायटल
सलमानच्या कभी ईद कभी दिवाली (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
Kabhi Eid Kabhi Diwali : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचे (Salman khan) चित्रपट हे रिलीज होण्याआधीच चर्चेत असतात. त्याचे चित्रपट हे कथी कथानकामुळे तर कधी नावामुळे चर्चेत असतात. सलमानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. रिपोर्टनुसार आता सलमानच्या या चित्रपटाचं नाव पुन्हा बदललं आहे. आधी या चित्रपटाचं नाव भाईजान असं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर चित्रपटाच्या टीमनं कभी ईद कभी दिवाली (Kabhi Eid Kabhi Diwali) असं या चित्रपटाचं नाव ठेवलं पण आता पुन्हा चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय या चित्रपटाच्या टीमनं घेतला आहे.
रिपोर्टनुसार, सलमानच्या या चित्रपटाचं नाव पुन्हा भाईजान ठेवण्याचा निर्णय चित्रपटाची टीम घेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं नाव कभी ईद कभी दिवाली असं ठेवण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमनं घेतला होता. पण आता या चित्रपटाचं नाव बदलल्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
चित्रपटामधील कलाकार
सलमानसोबतच या चित्रपटामध्ये आयुष शर्मा आणि जाहिर इकबाल हे देखील प्रमुख भूमिका साकारणार होते. पण आता त्यांच्या ऐवजी जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांना या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाबरोबरच टायगर-3 या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा :