एक्स्प्लोर
'ट्युबलाईट'च्या अपयशामुळे सलमानने लकी ब्रेसलेट काढलं?

मुंबई: अभिनेता सलमान खान आणि त्याच्या हातातलं ब्रेसलेट हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. पण सलमानच्या हातातलं हे ब्रेसलेट आता गायब झालं आहे. सलमानसाठी हातातलं ब्रेसलेट फारच लकी होतं. मात्र ट्युबलाईट या सिनेमाच्या अपयशानंतर सलमानने हे लकी चार्म असलेलं ब्रेसलेट काढल्याची चर्चा आहे. या ब्रेसलेटची जागा आता गळ्यातल्या लॉकेटने घेतली आहे. वडील सलीम खान यांनी दिलेलं ब्रेसलेट सलमान कधीही हातातून काढत नसे. हे ब्रेसलेट तो 'लकी' मानत होता. मात्र ट्युबलाईटच्या अपयशानंतर त्याने हे ब्रेसलेट काढल्याची चर्चा आहे. ब्रेसलेटऐवजी त्याने आता लॉकेट घातल्याचं सांगण्यात येत आहे. हे लॉकेट तावीजसारखंच आहे. आता हे तावीज लकी ठरेल अशी आशा सलमान आणि त्याच्या चाहत्यांना असेल.
आणखी वाचा























