Somy Ali on Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईसोबत झूम कॉलवर बोलण्याची इच्छा, 'त्या' पोस्टनंतर सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया; म्हणाली, 'माझा हेतू हा...'
Somy Ali on Salman Khan :सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने लॉरेन्स बिश्नोईसाठी केलेल्या पोस्टनंतर तिची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
Somy Ali on Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान (Salman Khan) पुन्हा एकदा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलेलं आहे. सलमानसोबतच्या संबंधांमुळेच बाबा सिद्दीकीची हत्या केल्याचं बिश्नोई गँगकडून सांगण्यात आल्याचंही म्हटलं जातंय. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला पुन्हा एकदा जीवे मारणाच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. याच सगळ्यात सलमानची गर्लफ्रेंड सोमी अलीची (Somy Ali) एक पोस्ट बरीच चर्चेत आली होती.
सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईसोबत संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचसंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्यासाठी मेसेजही दिला होती. या पोस्टनंतर तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं. पण आता या सगळ्यावर सोमीचं स्पष्टीकरण आलं आहे.
सोमी अलीने दिलं स्पष्टीकरण
सोमी अलीने नुकतीच हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या पोस्टवर स्पष्टीकरण दिलं आहे. तिने म्हटलं की, लॉरेन्ससोबत झूम कॉलवर बोलणं, त्यामागे शांततेत संवाद साधणं हा हेतू होता. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली त्यामुळे मी बरीच काळजीत होते. पण ही पोस्ट करुन कोणत्याही प्रकारचा तणाव वाढवण्याचा माझा हेतू नव्हता. आजची फिल्म इंडस्ट्री ही 90च्या दशकापेक्षाही वेगळी आहे. या इंडस्ट्रीमध्ये सुरक्षा हा कायमच चिंतेचा विषय राहिलाय. विशेष करुन महिलांसाठी हा जास्त महत्त्वाचा विषय होतोय. मला स्वत:ला वैयक्तिक रित्या कोणत्याही धमक्यांचा सामना करावा लागला नसला तरीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
होणाऱ्या ट्रोलिंगवर सोमी अलीने म्हटलं की, ट्रोल करणारे हे तुमचा तिरस्कार करण्यासाठी कारणं शोधतच असतात. अशा पद्धतीने ट्रोल करणाऱ्यांना माझा एक खास सल्ला आहे. स्क्रीनपासून दूर राहा, बाहेर जा, आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करा आणि तुमचे मित्र इतरांशी कशाप्रकारे संवाद साधतात त्याकडे लक्ष द्या.
सोमी अलीची पोस्ट नेमकी काय होती?
सोमी अलीने इंस्टाग्रामवर लारेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "हा लॉरेन्स बिश्नोईसाठी थेट संदेश आहे. नमस्कार, लॉरेन्स भाई, तुम्ही तुरुंगातूनही झूम कॉल करत असल्याचे मी ऐकलं आणि पाहिलं आहे, म्हणून मला तुमच्यासोबत थोडी माहिती शेअर करायची आहे. कृपया मला सांगा हे कसं शक्य होईल? संपूर्ण जगात तुमचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे राजस्थान. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचं आहे, पण आधी तुम्ही झूम कॉल करा आणि पूजेनंतर थोडी चर्चा करुया. मी सांगणार आहेत, त्या गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर आहेत, याची खात्री करुन घ्या. कृपया तुमचा मोबाईल नंबर द्या आणि हे तुमच्यासाठी खूप चांगले असेल. धन्यवाद".