Salman Khan And Boxer Nikhat Zareen: 'साथिया तूने क्या किया....'; बॉक्सर निखत जरीनसोबत सलमानचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल
नुकताच सलमानचा (Salman Khan) एक खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो निखत जरीनसोबत (Nikhat Zareen) डान्स करताना दिसत आहे.
Salman Khan And Boxer Nikhat Zareen Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान त्याच्या स्टाईलनं आणि फिटनेसनं अनेकांची मनं जिंकतो. नुकताच सलमानचा एक खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो निखत जरीनसोबत (Nikhat Zareen) डान्स करताना दिसत आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकवणारी बॉक्सर निखत जरीननं नुकताच सलमान खानसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आणि निखत हे दोघे 'साथिया ये तूने क्या किया' या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमधील दोघांच्या केमिस्ट्रीला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. निखत जरीन हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'फायनली इंतेजार खतम हुआ...'. तसेच निखतनं फॅन मूव्हमेंट या हॅशटॅगचा वापर देखील कॅप्शनमध्ये केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
निखत आणि सलमानचा लूक
व्हिडीओमध्ये निखत आणि सलमान हे दोघे कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. सलमान हा व्हाईट शर्ट, ब्लॅक पँट आणि ब्लॅक शूज अशा लूकमध्ये दिसत आहे तर निखत ही ब्लू टू पीस आणि व्हाईट शूज अशा लूकमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
सलमान खान आणि निखत जरीन यांच्या या व्हिडीओमध्ये ते दोघे 'साथिया तूने क्या किया....' हे गाणं रिक्रिएट करताना दिसत आहेत. हे गाणं 1991 मध्ये रिलीज झालेल्या 'लव' या अल्बममधील आहे.
सलमानचे आगामी चित्रपट
'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'टायगर 3'मध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. त्याचबरोबर शहनाज गिल ते पलक तिवारीसारखे नवे स्टार्स 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खान 'बिग बॉस 16' देखील होस्ट करत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Salman Khan : मुंबई पोलिसांचं देव भलं करो.., लहान मुलाची तस्करी रोखल्याबद्दल सलमान खानने केलं कौतुक