एक्स्प्लोर

Salman Khan : धमकी प्रकरणानंतर सलमानने विदेशातून मागवली बुलेटप्रूफ कार

Salman Khan : सलमान खानने एक नवी बुलेटप्रूफ कार (Bulletproof Suv) खरेदी केली आहे.

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या धमकीप्रकरणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पण आता या धमक्यांना सलमान खान घाबरला असल्याचं समोर आलं आहे. भाईजानने आता बुलेटप्रूफ कार (Bulletproof Suv) खरेदी केली आहे. 

सलमानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार (Salman Khan New Bulletproof Suv)

सलमानने आपल्या ताफ्यात आता निसान पेट्रोल एसयूवीचा (Nissan Patrol Suv) समावेश केला आहे. अद्याप ही गाडी भारतात लॉन्च झालेली नाही. पण सुरक्षेच्या दृष्टाने दबंग खानने ही गाडी विदेशातून मागवली आहे. दक्षिण आशियात या गाडीची चांगलीच क्रेझ आहे. ही बुलेटप्रूफ गाडी असल्याने या कारची किंमत खूपच जास्त आहे.

सलमान खानने खरेदी केलेली बुलेटप्रूफ कार ही पांढऱ्या रंगाची असून खूपच स्टायलिश आहे. एका जपानी कंपनीने या गाडीची निर्मिती केलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या गाडीला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. सलमानने बुलेटप्रूफ कार खरेदी केल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या भाईजानला शुभेच्छा देत आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात सलमानने या नव्या बुलेटप्रूफ गाडीतून हजेरी लावली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Bollywood Bubble (@bollywoodbubble)

सलमानला गेल्या काही दिवसांपूर्वी गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. यात लिहिलेलं होतं की, प्रकरण मिटवा, समोरासमोर बोलायचं असेल तर सांगा. वेळीच कळवलं आहे. पुढच्या वेळी झटका बसेल". 

सलमानचे आगामी प्रोजेक्ट (Salman Khan Upcoming Project)

सलमान खान सध्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा येत्या 21 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तो दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गिल आणि पलक तिवारीसोबत झळकणार आहे. तसेच त्याचा 'टायगर 3' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात भाईजान आणि किंग खान स्क्रीन शेअर करताना दिसतील. तसेच त्याचा 'किक 2' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

संबंधित बातम्या

Salman Khan : '68 व्या फिल्मफेअर फिल्म अवॉड्स'मध्ये सलमान खानकडे महत्त्वाची जबाबदारी; लवकरच पार पडणार दिमाखदार पुरस्कार सोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget