Yentamma Song Out : सलमानचा लुंगी अवतार; राम चरण आणि वेंकटेश दग्गुबातीसोबत थिरकला 'Yentamma' गाण्यावर
Salman Khan : सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील 'येंतम्मा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Yentamma Song Out : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. आता या सिनेमातील 'येंतम्मा' (Yentamma Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील सलमानचा दाक्षिणात्य लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
'येंतम्मा' या गाण्यात सलमान खान आणि वेंकटेश दग्गुबाती, राम चरणसह, पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव गुयाल, जस्सी गील आणि पलक तिवारीची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्यात सलमान खानने लुंगी नेसलेली असून तो गॉगल लाऊन डान्स करताना दिसत आहे. सलमान आणि राम चरण, वेंकटेशचा हटके स्वॅग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
'येंतम्मा' हे गाणं युट्यूबवर रिलीज होताच या गाण्याला 569 हजारपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या गाण्यातील राम चरणची धमाकेदार एन्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर दुसरीकडे सलमानच्या लुंगी अवताराचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
सलमानचा 'येंतम्मा' सोशल मीडियावर चर्चेत!
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील 'नय्यो लगदा','बिल्ली बिल्ली' आणि 'जी रहे थे हम', 'बथुकम्मा' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता या सिनेमातील 'येंतम्मा' हे पाचवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. चाहत्यांमध्ये या गाण्याची चांगलीच क्रेझ आहे. सलमानने सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"येंतम्मा' गाणं आऊट".
'किसी का भाई किसी की जान' कधी रिलीज होणार?
सलमान खान (Salman Khan) आणि पूजा हेगडेचा (Pooja Hegde) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सलमान खान, पूजा हेगडेसह जस्सी गील, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
संबंधित बातम्या