IIFA Rocks 2023:आधी सिक्युरिटी गार्डनं ढकललं, आता विकीला भाईजानकडून मिळाली झप्पी; व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

IIFA Rocks 2023: नुकताच अबू धाबी (Abu Dhabi) येथे IIFA रॉक्स 2023 (IIFA Rocks 2023) हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील ग्रीन कार्पेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
काही दिवसांपूर्वी IIFA 2023 पुरस्कार सोहळ्याची एक पत्रकार परिषद पार पडली होती. या परिषदेत सलमान खान आणि विकी कौशल यांनी हजेरी लावली होती. सलमान आणि विकीचा या पत्रकार परिषदेमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानचा सिक्युरिटी गार्ड हा विकी कौशलला ढकलताना दिसला. आता सलमान आणि विकी यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ IIFA रॉक्स 2023 (IIFA Rocks 2023) या पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा विकीला मिठी मारताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
#WATCH | Actor Salman Khan and actor Vicky Kaushal attend IIFA Awards 2023 in Abu Dhabi, United Arab Emirates pic.twitter.com/pR0AKTZsr9
— ANI (@ANI) May 26, 2023
सलमान खान आणि विकी कौशल यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दिसले की , विकी कौशल चाहत्यांसोबत सेल्फी काढत आहे, त्याच दरम्यान सलमानचा ताफा तिथे पोहोचतो. सलमान हा अनेक बॉडीगार्ड्ससोबत तिथे येतो. त्या दरम्यान, विकी सलमानला शेक हँड करण्याचा प्रयत्न करतो मात्र सलमान खान त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर सलमानचा सिक्युरिटी गार्ड विकीला ढकलतो.
No matter who you are, you have to clear the path when Tiger is on his way.
— MASS (@Freak4Salman) May 25, 2023
The persona of #SalmanKhan 🔥 pic.twitter.com/pRSB7iwQ82
सलमान खान हा लवकरच टायगर-3 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर विकी कौशलचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या























