एक्स्प्लोर

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, फक्त सलमानच नव्हे तर आणखी दोन कलाकार होते रडारवर!

Salman Khan House Firing Case Update : मुंबई पोलिसांनी पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक केली होती. या पाचव्या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Salman Khan House Firing Case Update : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक केली होती. या पाचव्या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून मोहम्मद चौधरी याला अटक केली होती. 

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी  मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजस्थानमधून अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद रफिक चौधरी याने अभिनेता सलमान खानसह इतर दोन बॉलीवूड कलाकारांच्या घरांचीही तपासणी केली होती. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल याने हल्लेखोरांना आपल्या बोलवण्यात फसवले. तुम्ही उदात्त काम करणार आहात आणि त्यातून  कामाचे खूप चांगलं फळ मिळेल. या हल्ल्यानंतर नावासोबतच चांगले पैसेही मिळतील असे अनमोलने हल्लेखोर आरोपींना सांगितले असल्याचे तपासात समोर आले आहे. 

आणखी दोन कलाकारांच्या घरांची झाली रेकी

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधल्या घराच्या दिशेनं  झालेल्या गोळीबार प्रकरणातला पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यानुसार लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या रडारवर फक्त सलमान खानच नाही तर बॉलिवूडचे इतरही कलाकार होते. मोहम्मद रफिक चौधरीच्या मोबाईलमधून सलमान खानच्या घरासोबतच इतरही कलाकारांच्या घराचे व्हिडिओ सापडले आहेत. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कलाकारांची नावे जाहीर केलेली नाहीत. 

अनमोल बिष्णोईने सांगितले होते टार्गेट

मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्च 2024 रोजी पनवेलमध्ये हल्लेखोरांपर्यंत शस्त्र पोहचवण्यात आले. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलने त्यांना टार्गेटची माहिती दिली. आत्महत्या केलेला आरोपी अनुज थापन आणि सोनू विष्णोईने शस्त्रे दिल्यानंतर अनमोलने शूटर्सना सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याची सूचना केली. तोपर्यंत हल्लेखोरांना कोणावर गोळ्या चालवायच्या आहेत, याची माहिती नव्हती. 

सलमानच्या फार्म हाऊसची झाली होती रेकी

गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींनी सलमान खानच्या फार्म हाऊसचीदेखील रेकी केली होती. त्या ठिकाणी सलमान खान आलाच नाही. त्यानंतर अनमोल बिष्णोईने हल्लेखोरांना वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करून हल्ला करण्याची सूचना केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget