एक्स्प्लोर

बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान? गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत भाईजानला धमकी

Bishnoi Gang News : सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे.

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या अंधाधुद गोळीबाराची (Firing) जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली आहे. एका फेसबुक अकाऊंटवरील पोस्टद्वारे या गोळीबाराची सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे.

सलमान खानच्या घराबाहेर अंधाधुद गोळीबार

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचा संशय पोलिसांना होता. आता या प्रकरणात एका व्यक्तीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत यामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचं म्हटलं आहे. अनमोल बिश्नोई या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून सलमान खान घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

बिश्नोई गँगने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी

या गोळीबार प्रकरणात आधीच बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. दरम्यान, अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहेत.

पोस्टमध्ये काय म्हटलंय? 

अनमोल बिश्नोई

ओम. जय श्री राम. जय गुरु भवेश्वर. जय गुरु दयानंद सरस्वती. जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला जात असेल तर युद्ध योग्य आहे. सलमान खान  आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं आहे. तुला आमची ताकद समजावी यासाठी हे केलं आहे. तुला ही शेवटचा इशारा आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाहीत. ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानल आहेस. त्यांच्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. बाकी मला बोलायची सवय नाही.

जय श्री राम 
जय भारत 
सलाम शाहिदा 
(लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) 
गोल्डी ब्रार
रोहित गोदरा
कला जठारी

गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर फायरिंग

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे अंधाधुद गोळीबार झाला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञातांनी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर फायरिंग केली. यावेळी पाच राऊंड फायर करण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमद्ये समोर आलं आहे. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

भाईजानच्या जीवावर का उठलाय लॉरेंन्स बिश्नोई? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget