एक्स्प्लोर

Salman Khan defamation case: सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टानं निकाल राखून ठेवला; काय आहे प्रकरण?

मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. पण न्यायालयाने अजूनही निर्णय राखून ठेवला आहे.

Salman Khan defamation case:  अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) पनवेल (Panvel) येथील फार्महाऊस जवळच असलेल्या भूखंडाचे मालक केतन कक्कड (Ketan Kakkad) यांनी एका यूट्युब चॅनलच्या माध्यमातून बदनामी केल्यानं सलमाननं त्याच्या विरोधात मानहानीचा खटला केला होता. अशा प्रकारच्या अपमानकारक व्हिडिओला ब्लॉक करत तात्काळ हटवून टाकावं, असे अंतरिम आदेश देण्याची विनंती करत सलमानने हायकोर्टात केली होती. मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. पनवेलमधील सलमानच्या फार्म हाऊसशेजारी राहणाऱ्या केतन कक्करविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मुंबई सत्र न्यायालयानं सलमान खानला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सलमान खाननं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

काय आहे प्रकरण? 

सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कड विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला यावर बंदी घातली पाहिजे, असं या तक्रारीमध्ये सलमाननं म्हटलं

कक्कड यांचा व्हिडीओ हा काल्पनिक असून केवळ बदनामीकारकच नाही तर सलमान खानविरोधात लोकांमध्ये जातीयदृष्ट्या तेढ भडकवणाराही आहे, असा दावा सलमानच्यावतीनं जेष्ठ वकील रवी कदम यांनी केला. तसेच अल्पसंख्याक समुदायाचा सदस्य असलेला सलमान त्याच्या फार्महाऊसजवळील गणेश मंदिर बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कक्कड म्हणाले आहेत. एकीकडे अयोध्येत मंदिर उभाण्यासाठी 500 वर्षे लागली तर इथे सलमान खान एक गणेश मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करत आहे असा उल्लेख करत कक्कड यांनी सलमानची तुलना थेट बाबर आणि औरंगजेबशी केल्याचा आरोप कदम यांनी केला. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर शेकडो लोकं सलमानविरोधात सोशल मीडियावर शेरेबाजी करत असल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.

सलमानचे आगामी चित्रपट

 ‘पठाण’ या चित्रपटामध्ये सलमान कॅमिओ करणार आहे. ‘टायगर 3’, 'किसी का भाई किसी की जान'  हे त्याचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या: 


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget