(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan Death Threat: सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट; धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस केली जारी
Salman Khan Death Threat: मुंबई पोलिसांनी ब्रिटनमध्ये शिकत असलेल्या हरियाणातील विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर (LOC) जारी केले आहे.
Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) धमकी प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध एलओसी जारी केली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ब्रिटनमध्ये शिकत असलेल्या हरियाणातील (Haryana) तृतीय वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. मार्च महिन्यात सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला गोल्डीच्या नावाने धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. त्यानुसार सलमानच्या जवळच्या मित्राने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी प्राथमिक तांत्रिक तपशील तपासल्यानंतर हा ई-मेल यूकेहून पाठवल्याचे आढळले आहे. हरियाणातील वैद्यकीय विद्यार्थ्यानं मेल पाठवल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी या प्रकरणी लुक आऊट परिपत्रक काढले.
गेल्या काही दिवसांपासून सलमानला (Salman Khan)पत्राद्वारे तसेच ईमेलद्वारे धमकी दिली जात आहे. सलमान खानने एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. या पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या धमकीबाबत विचारण्यात आले होते. तुम्ही सगळ्या देशाचे भाईजान आहात, मग आता मिळणाऱ्या धमकीकडे कसे पाहता, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान खानने उत्तर देताना म्हटले की, मी सगळ्यांचा भाई नाही, काहींचा 'भाई' आहे..तर कोणाचा तरी 'जान' आहे. असे उत्तर देत सलमान खानने धमकीवर थेट उत्तर देणे टाळले.
काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आल होता. ज्यामध्ये 'गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना सलमान खानशी बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. बघितली नसेल तर बघायला सांगा. प्रकरण बंद करायचं असेल तर हे प्रकरण मिटवा. समोरासमोर बोलायचे असेल तर सांगा. आता वेळीच कळवले आहे, पुढच्या वेळी फक्त झटकाच बसेल, अशी धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला होता.'
'एबीपी'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला (Salman Khan) उघडपणे धमकी दिली. आमच्या भागात सलमान खानने काळवीट मारल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. त्याला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देईन.
सलमान खानचे 'किक 2', 'टायगर 3' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या