एक्स्प्लोर
Advertisement
हागणदारीमुक्तीचा सदिच्छादूत सलमानलाच घरासमोर टॉयलेट नको
मुंबई : मुंबई महापालिकेची हागणदारीमुक्त स्वच्छ मुंबई मोहीम गलिच्छ राजकारणात अडकली आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सलमान खानची नियुक्ती झाल्यानंतर ही मोहिम चर्चेत आली. मात्र सदिच्छादूत या नात्याने इतरांना शौचालयं बांधण्याचा सल्ला देणारा सलमान खान स्वतःच्या घरासमोरच होऊ घातलेलं शौचालय हटवण्याच्या प्रयत्नात आहे.
हागणदारीमुक्त स्वच्छ मुंबई या योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर असणारा सलमान खान स्वतःच्याच घरासमोर बांधलं जाणारं सार्वजनिक शौचालय हटवण्याच्या प्रयत्नात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सलमानसोबतच त्याचे वडिल सलीम खान, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनाही या संभाव्य शौचालयाचा त्रास होऊ लागला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हागणदारीमुक्त मुंबई या योजनेसाठी ज्यांनी सलमानची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली, त्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनंही सलमानची ही मागणी मान्य केली आहे.
मात्र या चर्चेला एक वेगळाच पदर आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुढाकारानं भाजपनेच सलमान खानच्या घरासमोर शौचालय बांधण्याचा आग्रह धरला, असं म्हटलं जातं. ज्यात आपसूकपणे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सलमानच्या मैत्रीमुळे खडा पडल्याची चर्चा आहे.
शिवसेना मात्र यावर कातडीबचाव भूमिका घेत आहे. सामान्यांच्या प्रश्नावर वर्षानुवर्ष गप्प असणारे सत्ताधारी सलमानच्या घरासमोरचं शौचालय पाहून तत्परतेनं हालचाली करत आहे.
मोठा गाजावाजा करुन निवडणूकीपूर्वी सुरु केलेली स्वच्छ मुंबईची मोहिम भाजप-शिवसेनेतल्या गलिच्छ राजकारणानं आधीच मलिन झाली आहे. त्यातच ब्रँड अँबेसेडरपद मिरवणारे बिंग ह्युमन केवळ नावापुरतेच उरले आहेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement