एक्स्प्लोर

50 Days Of Death Threat : जीवे मारण्याच्या धमकीनंतर पहिल्यांदाच सलमान सार्वजनिक कार्यक्रमात, कडक सुरक्षाव्यवस्थेत केलं ‘विक्रांत रोणा’चं प्रमोशन!

Salman Khan : 6 जून रोजी एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून सलमान खानने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नव्हती.

Salman Khan : गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तेव्हापासून सलमान खान सार्वजनिक ठिकाणी दिसणं किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणं टाळत होता. पण, लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या जवळपास दीड महिन्यानंतर आता सलमान खान पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सामील झाला आहे. 6 जून रोजी एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खान नुकताच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसला. सलमान खान त्याची प्रस्तुती असलेल्या ‘विक्रांत रोणा’ (Vikrant Rona) या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून सलमान खानने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नव्हती. मात्र, तो सतत त्याच्या चित्रपटांचे शूटिंग करत होता. पण, सलमान खानने मुंबईतील वांद्रे येथील ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये पार पडलेल्या 'विक्रांत रोणा'च्या प्रमोशनला कडेकोट बंदोबस्तात हजेरी लावली होती.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था!

‘विक्रांत रोणा’चा प्रमोशन इव्हेंट सुरू होण्यापूर्वी साध्या वेशातील चार पोलीस बराच वेळ कार्यक्रमस्थळाची पाहणी करताना दिसले. ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलच्या आवारात 3 गणवेशधारी पोलिसही उपस्थित होते. सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी सुमारे 45 मिनिटे पाहणी केल्यानंतर, सलमान खानच्या टीमच्या लोकांना खात्री पटली की, या कार्यक्रमस्थळी सलमानला कोणताही धोका नाही. त्यानंतर काही वेळाने सलमान खान पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह कार्यक्रम स्थळी आला. सलमान जेव्हा कार्यकम स्थळापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्समधील त्याच्या घरातून बाहेर पडला, तेव्हा सुरक्षेसाठी त्याच्या कारच्या मागे पोलिसांची जीपही धावत होती.

प्रसिद्ध कलाकारांची हजेरी

'विक्रांत रोणा'च्या प्रमोशन कार्यक्रमात सलमान खानची एंट्री डान्सिंग स्टाईलमध्ये झाली. चित्रपटाचे मुख्य कलाकार किच्चा सुदीप आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी त्यांच्या चित्रपटाच्या गाण्यावर धमाल डान्स केला आणि काही वेळाने यात सलमानही सहभागी झाला. प्रमोशनच्या निमित्ताने सलमान खान चांगल्या मूडमध्ये दिसला. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेल्या रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्यासोबत किच्चा, जॅकलिन आणि स्टेजवर उपस्थित असलेल्या खास पाहुण्यांनीही खूप धमाल केली.

या भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'विक्रांत रोणा'

अनूप भंडारी लिखित आणि दिग्दर्शित, 'विक्रांत रोना' थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: 

Vikrant Rona : किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खाननेही केलं कौतुक!

Kiccha Sudeep : साऊथ चित्रपटांच्या यशाबाबत अभिनेता किच्चा सुदीपनं मांडलं मत; म्हणाला, 'हा कंटेन्टचा विजय'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget