एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हायरल सत्य : रिंकू राजगुरुने शाळा सोडली!
सोलापूर : सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरु यंदा दहावीत शिकत आहे, मात्र आर्चीने आता शाळेलाच रामराम केला आहे. आर्चीने 30 जूनला शाळा सोडली आहे.
प्रचंड प्रसिद्धी आणि सध्या मिळत असलेली कामं, यामुळे आर्चीने शाळा सोडली आहे. रिंकूने 17 नंबरचा फॉर्म भरला असून, ती घरी अभ्यास करुन बाहेरून परीक्षा देणार आहे.
संबंधित बातमी – आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!
आर्ची जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झालं होतं. त्यामुळे घरी अभ्यास करुन बाहेर परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला आहे. एकंदरीत रिंकूला तिच्या प्रसिद्धीचा एक फटकाच बसल्याचं दिसून येतंय.
रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकत होती. सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळालेली 'आर्ची' यंदा दहावीत गेली. नववीत तिला 84 टक्के गुण मिळाले. मात्र आता तीने शाळेतूनच नाव काढून घेतलं आहे.
29 एप्रिलला ‘सैराट’ रिलीज झाला. सिनेमाने ‘सैराट’ कामगिरीही केली. आर्ची म्हणजे रिंकू रातोरात स्टार झाली. रिंकूने ‘सैराट’मधल्या आर्चीला स्पर्श केला आणि भूमिकेचं सोनं झालं. आता तिच्यासाठी दहावीचा टर्निंग पॉईंट आहे. मात्र आता ती बाहेरुन परीक्षा देणार आहे.
संबंधित बातम्या
‘सैराट’ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात
आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!
VIDEO : माधुरीच्या शोमध्ये आर्ची-परशाचा धुमाकूळ
नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग
सैराट पाहून करण जोहर, रणबीर, वरुण, आलिया म्हणतात…
कडेकोट सुरक्षेत रिंकू राजगुरु पहिल्यांदाच अकलूजमध्ये!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement